महिला, अंधश्रद्धा आणि सूर्यग्रहण

Update: 2020-06-21 11:28 GMT

ग्रहण म्हटलं की वर्षांनुवर्ष समाजात खोलवर रुजलेला गैरसमज आणि अंधश्रद्धा डोळ्यासमोर उभी राहते. विशेषत: महिला अशा अंधश्रद्धेवर मोठ्याप्रमाणात विश्वास ठेवतात. त्यामुळे समाजात ग्रहणाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अंनिस च्या वतीने सूर्यग्रहणाचा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला.

आज उत्तर भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण तर महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळाले. सूर्यग्रहण हे एक भौगोलिक बाब असून ते निसर्गचक्राचा भाग आहे. ग्रहणाच्या काळात भाजी चिरू नये, अन्न ग्रहण करू नये, पाणी पिऊ नये या अंधश्रद्धांना मोडीत काढत महिलांनी भाजी चिरून आणि अन्न ग्रहण करून त्या अंधश्रद्धेला धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. यावर प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अलका कुलकर्णी यांनी नेमकं काय म्हटलं आहे पाहा हा व्हिडिओ...

Full View

हे ही वाचा...

करोना लॉकडाउनमध्येही लोकांनी घेतला सूर्यग्रहण बघण्याचा आनंद…

Similar News