करोना लॉकडाउनमध्येही लोकांनी घेतला सूर्यग्रहण बघण्याचा आनंद...

Update: 2020-06-21 12:05 GMT

या दशकातील शेवटचं कंकणाकृती सूर्यग्रहण आज २१ जून २०२० दिसलं. सूर्यग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे, आणि तो एक खगोलीय आविष्कार असतो. म्हणून सूर्यग्रहण पाहू नये, त्यामुळे नुकसान होते अशा अंधश्रद्धा बाळगू नये असे आवाहन खगोलशास्त्रज्ञ कायम करत असतात. आजचं सूर्यग्रहण हे उत्तर भारताच्या राजस्थान ते उत्तराखंड या दरम्यान कंकणाकृती तर उर्वरित भारतामधून खंडग्रास स्वरुपाचं दिसलं. महाराष्ट्रात सूर्य ५०% पेक्षा जास्त झाकलेला दिसला. ग्रहण साधारण १०.०० वाजता सुरू होऊन दुपारी १.३५ वाजता संपलं. अनेक हौशी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन ग्रहण पाहिलं. देशात यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण २०३१ साली दिसणार आहे.

Full View

Similar News