महिला आयपील (WIPL) लवकरचं सुरू होणार?

Update: 2022-05-11 04:35 GMT

आयपीएल म्हणजे जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आयपीएल चे चाहते आहेत. यामध्ये वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या देशाचे खेळाडू विकत घेतात आणि त्यांच्या मध्ये सामना खेळला जातो. असे अनेक रंगतदार सामने आयपीएलमध्ये पाहायला मिळतात. आता पुरुष आयपीएल स्पर्धेबरोबरच महिला आयपीएल स्पर्धा घेण्याबाबत सुद्धा बीसीसीआयने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आता संघ विकत घेण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) महिलांच्या आयपीएल मीडिया हक्कांचा लिलाव करताना भरपूर पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. बीसीसीआय 2022 च्या अखेरीस निविदा काढेल अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ब्लूमबर्गला सांगताना म्हंटल आहे की, अनेक ब्रँड्सनी बोर्डाकडून WIPL (महिला इंडियन प्रीमियर लीग) चे हक्क विकत घेण्यास स्वारस्य दाखवले आहे.

आयपीएल खेळणारे संघ बोली लावू शकतात

बीसीसीआयला पुढील वर्षाच्या सुरुवातीला महिला क्रिकेट लीग आणि सहा लीग संघांच्या सामन्यांच्या प्रसारण अधिकारांचा लिलाव करायचा आहे. विद्यमान आयपीएल फ्रँचायझी महिला आयपीएल संघांसाठी बोली लावतील असे जय शाहा यांनी म्हंटल आहे.

राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ आहेत ज्यांनी आधीच WIPL संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. नीता अंबानी यांनी यापूर्वीही महिला क्रिकेटच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. BCCI द्वारे आयोजित महिला T20 चॅलेंजसाठी जिओने शीर्षक प्रायोजकत्व हक्क विकत घेतले होते.

WIPL हे IPL सोबत खेळले जाणार नाही

सहा संघांची महिला आयपीएल पुढील वर्षी सुरू होणार असून बीसीसीआय त्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करत आहे. त्या पूर्वी आयपीएल 2023 पासून वेगळ्या विंडोमध्ये होईल.

Tags:    

Similar News