CWG 2022:पी .व्ही.सिंधू आणि मनप्रीत सिंग ने केले भारतीय संघाचे नेतृत्व

या शानदार सोहळ्यात भारताच्या 213 जणांच्या पथकासह 72 हून अधिक देश सहभागी झाले आहेत.

Update: 2022-07-29 05:22 GMT


 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा उद्घाटन समारंभ बरमिंगहॅम मध्ये अलेक्झांडर स्टेडियम मध्ये पार पडला . पी .व्ही.सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले

या शानदार सोहळ्यात भारताच्या 213 जणांच्या पथकासह 72 हून अधिक देश सहभागी झाले आहेत.यावर्षीच्या स्पर्धेत पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना अधिक सुवर्णपदके दिली जाणार आहेत. महिला गटात १३६तर पुरुष घटना १३४ सुवर्ण पदके वितरीत केली जाणार आहेत.

या सोहळ्यात १० मीटर उंच रागीट बैल(bull) उभारण्यात आला होता ज्याला महिला साखळीने ओढत होत्या.




19 व्या शतकात अनेक महिला उष्ण आणि अरुंद अशा घरामध्ये अगदी तुटपुंज्या पगारावर काम करत असत.महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी संप केला गेला होता. समारंभाच्या शेवटी सहा पदक विजेत्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणला .यामधील तीन रंग लाल,पिवळा आणि निळा हे मानवता ,नियती आणि समानता यांना संबोधित करतात.

भारताकडून या स्पर्धेत कोण खेळाडू आहेत?

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांच्याशिवाय संघातील काही प्रमुख खेळाडू आहेत. मागील वर्षीच्या CWG चॅम्पियन मनिका बत्रा, आणि विनेश फोगट तसेच 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेते तजिंदरपाल सिंग तूर, हिमा दास आणि अमित पंघाल स्पर्धेत सहभागी आहेत. भारताचे प्रतिनिधित्व 215 खेळाडू करतील जे 19 क्रीडा शाखांमधील 141 स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत . महिला T20 क्रिकेट यंदा बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करत आहे, ज्यामध्ये अव्वल आठ संघ सुवर्णपदकासाठी स्पर्धा करत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध CWG मध्ये पदार्पण करणार आहे. तर महिला हॉकी संघ घानाशी भिडणार आहे.

Tags:    

Similar News