CWG 2022 :पी.व्ही.सिंधूने पटकावले सुवर्ण,केले संधीचे सोने ...

Update: 2022-08-08 10:12 GMT

Commonwealth Games 2022 मध्ये बॅटमिंटन स्पर्धेमध्ये PV Sindhu ने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे.कॅनडाच्या Michelle Li वर तिने 21-15, 21-13 अशी मात केली आहे.CWG 2022 मध्ये सुवर्ण जिंकत पुन्हा एकदा पी.व्ही.सिंधूने भारताच्या शिरपेचात यशाचा तुरा रोवला आहे .

भारताला बॉक्सिनगनंतर बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्याची आस लागली होती.भारताच्या पी.व्ही.सिंधूने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळण्याची नामी संधी सिंधूला मिळाली होती आणि या संधीच सोनं सुवर्ण जिंकत पी व्ही सिंधूने केले आहे .

ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने उपांत्य फेरीत मलेशियाच्या जिया याव मिनवर सलग दोन सेट्समध्ये विजय मिळवत महिला एकेरीची फायनल गाठली. २७ वर्षीय पिव्ही सिंधूने तिच्या अनुभवाच्या जोरावर सिंगपूरच्या येओ जिया मिनलवर ४९ मिनिटांच्या लढतीत २१-१९, २१-१७ असा दमदार विजय साकारला. सिंधूने २०१८ आणि २०१४ च्या स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते. या खेळात देखील सिंधूने आपली पकड मजबूत ठेवली होती.दरम्यान Commonwealth Games 2022 मध्ये बॅटमिंटन स्पर्धेमध्ये PV Sindhu ने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे. कॅनडाच्या Michelle Li वर तिने मात करत भारताला विजय मिळवून दिला आहे

Tags:    

Similar News