अभिमानास्पद; महिला संघाने तिरंगी मालिकेत सुवर्णपदक जिंकले...

Update: 2023-07-31 06:34 GMT

भारतीय हॉकी संघाने रविवारी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात यश संपादन केले आहे. महिला संघाने तिरंगी मालिकेत स्पेनचा 3-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, प्रो-लीगच्या कांस्यपदकाच्या लढतीत पुरुष संघाने नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव केला आहे. स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त स्पेनमधील बार्सिलोना शहरात महिला हॉकी तिरंगी मालिका आणि पुरुष गटातील 4 संघांची प्रो-लीग आयोजित करण्यात आली होती.

महिला संघ मालिकेत अपराजित राहिला...

महिलांच्या तिरंगी मालिकेतील शेवटचा सामना भारत आणि स्पेन यांच्यात बार्सिलोनाच्या टेरेसा शहरात खेळला गेला. भारताकडून वंदना कटारिया, मोनिका आणि उदिता यांनी गोल केले. स्पेनच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. पूर्ण वेळेनंतर स्कोअर लाइन 3-0 अशी होती आणि भारताने सामना जिंकला.

8व्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 1-1 आणि स्पेनविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यात लालरेमसियामीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा धुव्वा उडवला आणि आता स्पेनवरही 3-0 अशी मात केली. भारतीय संघाने या गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुवर्णपदक जिंकले.

Tags:    

Similar News