भारतीय महिला संघाला कांस्यपदक जिकण्याची संधी...

भरतीत महिला हॉकी संघाची लढत ब्रिटन सोबत होणार असून ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्याची संधी..आज आणखीन कोणते सामने असतील ते ही वाचा सविस्तर

Update: 2021-08-06 02:56 GMT

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील आजचा हा चौदावा दिवस आहे. आज भारतीय महिला संघाला कांस्यपदक जिकण्याची संधी असून हा सामना ब्रिटनच्या संघ विरुद्ध भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता होणार आहे. आज दिवसभरात भारताचे एकूण सहा सामने होणार आहेत. पहाटे 4 वाजता गोल्फ या खेळप्रकारातील महिला वयक्तिक स्ट्रोक प्लेची तिसरी फेरी आहे. यात अदिती अशोक व दीक्षा डागर हे खेळाडू सहभागी आहेत.

कुस्ती मध्ये आज दोन सामने आहेत पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो वजन गट व महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजन गट या सामन्याची वेळ सकाळी 8 वाजता आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता ॲथलेटिक्स या खेळ प्रकारातील महिला वीस किमी चालण्याची शर्यत आहे यात प्रियांका गोस्वामी भावना जाट या सहभागी आहेत. सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी पुरुष 4 बाय 400 मीटर रिले या खेल प्रकारातील पहिली फेरी आहे.

Tags:    

Similar News