यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये भारताची मान अभिमानाने उचवणार्या महिला...

टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण 7 पदके मिळाली त्यातील 3 पदके मिळवणाऱ्या महिला असून त्या कोण आहेत वाचा सविस्तर...

Update: 2021-08-08 01:47 GMT

पी. व्ही. सिंधू

भारतीय बॅडमिंटन स्टार पुसारला वेंकटा सिंधू म्हणजेच पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या ही बिंग जिओला हरवून सलग दोन ऑलिम्पिक पदके जिकण्याचा इतिहास रचला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने कांस्यपदक मिळवले. चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा जोरदार पराभव तिने केला. याआधी 2016 साली झालेल्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले होते. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी व रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असा बहुमान तिने मिळवला आहे.

साइखोम मीराबाई चानू

टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक जिकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्नॅचमध्ये 88 किलो, क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो व एकूण 202 किलो वजन उचलून ऐतिसिक विक्रमाची नोंद केली आहे. याआधी त्यांना २०१८ मध्ये भारतातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

लवलीना बोरगोहेन 

महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन यांनी कांस्य पदक पडकवले आहे. भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना दुसरी महिला बॉक्सर आहे. तिचे हे पहिलेच ऑलिम्पिक होते. यात तिने टर्कीच्या सुरमेनेलीने हिला आपल्या चपळ खेळीने चितपट करत कांस्यपदकावर तिचे नाव कोरले आहे. लवलिना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिसाठी पात्र ठरलेली पहिली महिला खेळाडू आहे. 2020 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराणे गौरविण्यात आहे असून ह पुरस्काराणे सन्मानीत करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News