अफगाणिस्तानमधील महिलांच्या सुरक्षेची मला काळजी वाटते: यशोमती ठाकूर

Update: 2021-08-16 03:49 GMT

अफगाणिस्तानमध्ये सरकारी फौजा आणि तालिबान यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यात आला आहे. तालिबानने आणखी आक्रमक होत आता कंदाहारसह 4 शहरांवर ताबा मिळवला आहे. तालिबानने राजधानी काबूल सुद्धा ताब्यात घेतली आहे. अफगाणिस्तानातील अनेक मोठी शहरं आणि तिथल्या 34 प्रांतांपैकी 50 टक्के प्रांतांच्या राजधान्यांची शहरं बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला असून, यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अफगाणिस्तानमधील महिलांच्या सुरक्षेची मला काळजी वाटते, असं म्हंटलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक आहे. तिथल्या महिलांच्या सुरक्षेची मला काळजी वाटते. तालीबानी विचारधारा किती घातक आहे याचा आपल्या देशातील लोकांनीही बोध घ्यावा.."

अफगाणिस्तानमध्ये वेगाने होत असलेल्या हालचाली पाहता याचे पडसाद जगभरात उमटताना पाहायला मिळत आहे. महिलांबाबत तालिबान संघटना खूप क्रूरपणे वागते हे अनेकदा समोर आले आहे. महिलांसाठी त्यांचे कायदे महिला हक्कांवर गदा आणणारी आहे. त्यामुळे जर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली तर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News