'निलेश राणेंनंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावरही गुन्हा दाखल करा'

Update: 2020-05-22 03:50 GMT

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकीय वादात ‘हिजडा’ शब्दप्रयोग केल्यामुळे तृतीयपंथीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा वाद संपत नाही तोच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या..

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्यावर तृतीयपंथी यांचा अपमान, अब्रूनुकसानी कारक वक्तव्य केल्याबद्दल हिजडा शब्द वापरल्याबद्दल तातडीने महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांनी पुढाकार घेऊन विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

“२३ मार्च रोजी अकोले तालुक्यातील भरसभेत इंदुरीकर प्रकरणात बोलताना हजारो लोकांसमोर तृतीयपंथीयांविषयी उपहासात्मक बोलून त्यांचा अपमान केला होता, त्याबाबत कोणीही आवाज उठवलेला नाही. त्यासंदर्भात व्हिडिओ उपलब्ध आहेत, तसेच युट्युब वर सुद्धा भाषण ऐकायला मिळतील.” असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/trupti.desai.589/videos/3002416136514955/?t=6

दरम्यान, किर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वादग्रस्त वक्तव्यानंतर तृप्ती देसाई यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला होता. यावर आमदार किरण लहामटे यांनी तृप्ती देसाई यांना बोलताना "हा अकोले तालुका क्रांतिकारकांचा आहे, आम्ही काय हिजड्याची अवलाद वाटलो का?" असा शब्दप्रयोग केला होता.