नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती – वर्षा गायकवाड

Update: 2020-08-11 15:20 GMT

नवीन शैक्षणिक धोरणाचे मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे 'नवीन शैक्षणिक धोरण: एक मूल्यमापन' या विषयावरती शालेय व उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवरांचा परिसंवाद आयोजित केला होता. त्यामध्ये बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षणाच्या मॉडेलचा अभ्यास न करता, इतर राज्यांच्या शिक्षण विभागाशी चर्चा न करता तयार करण्यात आलेले शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती आहे.” असं म्हटलं आहे.

आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणायचे आहे की त्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवायचे आहे हा प्रश्न या धोरणातील तरतुदींमुळे उपस्थित होतो असेही मत व्यक्त केले. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणावरुन केद्र सरकार विरुध्द हा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.