बंद स्तनपान कक्ष पाहून यशोमती ठाकूर यांचा संताप, राज्यभरातील स्तनपान कक्ष अहोरात्र सुरु ठेवण्याचे दिले आदेश....

बंद स्तनपान कक्ष पाहून यशोमती ठाकूर यांचा संताप, राज्यभरातील स्तनपान कक्ष अहोरात्र सुरु ठेवण्याचे दिले आदेश....

Update: 2021-08-14 11:59 GMT

नवजात बालकांना स्तनपान करता यावे. यासाठी राज्यात अनेक जिल्हा बस स्थानकांमध्ये स्तनपान कक्षाची उभारणी महिला बाल विकास विभागामार्फत करण्यात आली आहे. मात्र, कित्येकदा या स्तनपान कक्षाची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी तर तो बंद स्थितीत असतो. अशीच परिस्थिती अमरावती जिल्हा एसटी बस स्थानकांमध्ये अचानक भेट दिली असता महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट ठाकूर यांना आढळली.

अमरावती जिल्हा एसटी बस डेपो मधील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री Adv. यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त करत संबंधित एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा स्तनपान कक्ष उघडा ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्तनदा मातांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याविषयी बजावले.

कोणत्याही बसस्थानकामध्ये असलेला स्तनपान कक्ष हा स्तनदा माता यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे तो अहोरात्र उघडाच असला पाहिजे असे आदेश ठाकूर यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज अमरावती बस डेपो मध्ये जाऊन अचानक पाहणी केली असता ही बाब समोर आली.

दरम्यान यावेळी अमरावती बस स्थानकात आढळलेल्या एका महिला भिकाऱ्याची चौकशी करून सदर महिलेला आश्रमात दाखल करण्याच्या सूचना यशोमती ठाकूर यांनी दिल्या, तसेच कोणीही भीक मागणार नाही, याची दक्षता घ्या. असं अधिकाऱ्यांना बजावलं.

Tags:    

Similar News