‘तर तुमचे सगळे व्हिडीओ बाहेर येतील’, दानवेंना जावयाची धमकी

Update: 2020-05-30 05:03 GMT

काही दिवसांपुर्वी तडकाफडकी राजकीय संन्यास घेणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी आपले सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी दिलेल्या त्रासाचा पाढा वाचताना त्यांच्या सर्व कच्चाचिठ्ठा लोकांसमोर आणण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातमी..

“रावसाहेब दानवे हे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन” अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिलीय.

जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती आणि पत्नी संजना जाधव (Sanjana Jadhav) या राजकीय वारसदार असतील असं सांगितलं होतं. जाधव यांच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून कलह सुरू होता. त्यांच्या निवृत्तीमागे कौटुंबिक कारण असल्याच्याही चर्चा होत्या. त्यांच्या पत्नीने त्यांच्या आईविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

या व्हिडीओत हर्षवर्धन यांनी त्यांच्या कौटुंबिक वादांविषयी उघडपणे भावना व्यक्त केल्या. रावसाहेब दानवे यांनी त्यांना संपत्तीवरुन हिनवन्यावरुन बोलताना “माझे वडील आयएएस अधिकारी होते आणि तुम्ही चौथी पास. तुमच्या मुलींचं स्थळ घेऊन यायची तुमची लायकी नव्हती.” अशी टोकाची भुमिका त्यांनी घेतली.

https://www.facebook.com/rnonewsonline/videos/687482725362244/?t=0