'राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ दे'

Update: 2020-06-09 12:09 GMT

देशात कोरोनाचं संकट टळलेलं नाही तोच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना ‘राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊदेत’ असं खुलं आवाहन केलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यात केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना का लागू केली नाही असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा...

मोदीजी लोकप्रिय होतील या भीतीने ममता दीदी बंगालच्या धर्तीवर आयुष्यमान भारत योजना लागू करत नसल्याचा टोलाही अमित शाह यांनी व्हॅर्च्युअल रॅलीद्वारे पश्चिम बंगाल राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना लगावला आहे.

”केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना पश्चिम बंगाल राज्यात अद्याप लागू करण्यात आली नाही. अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीत ही योजना लागू केली. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ही योजना आपल्या राज्यात लागू केलेली नाही. ममता बॅनर्जी ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु या व्यतिरिक्त राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा, त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे.” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.