Act of God : निर्मला सितारमण यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय?

Update: 2020-08-28 05:16 GMT

कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. तुटीचा हा आकडा या वर्षासाठी 2.35 लाख कोटी रुपये असेल, असं आज केंद्र सरकारनं सांगितलं. आज जीएसटी कौन्सिलची बैठक झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना ही देवाची करणी आणि जीएसटी कलेक्शनवर परिणाम करणारा एक अदृश्य घटक ठरल्याचं सांगितलं.

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले असून त्यांनी केंद्राकडे जीएसटीच्या नुकसानभरपाईचा धोशा लावला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची १.५ लाख कोटींची नुकसानभरपाई केंद्राने दिलेली नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सलग पाच तास जीएसटी परिषदेत चर्चा झाली. या बैठकीमध्ये सीतारामन यांनी देशावर आलेले करोना संकट हे ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हटलं. म्हणजेच देशातील आर्थिक परिस्थितीसाठी कोणालाही थेट जबाबदार धरता येणार नसून निसर्गनिर्मिती गोष्टींमुळे हे आर्थिक संकट ओढावल्याचे निर्मला यांना सुचित करायचं होतं.