Video : खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना कोरोनाची लागण

Update: 2020-08-03 15:00 GMT

खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना कोरोनाची लागण, सासू सासऱ्यांना श्वास घेण्यास त्रास, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्य कोरोनाग्रस्त कोरोना बाधीत आढळले आहेत.. त्यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींचे थ्रोट स्वाब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसर कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. तर घराबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. यात रवी राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाला आहे.

आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा वय 72 वर्ष व आई सावित्रीबाई राणा वय 70 वर्ष यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी वोकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे हलवण्यात आला आहे.

आमदार रवी राणा हे स्वतः मातापित्यांसोबत नागपूर करिता रवाना झाले. कुटुंबातील इतर बाधित सदस्यांसह आमदार रवी राणा यांची कन्या वय ६ वर्ष, मुलगा वय ४ वर्ष हे पॉझिटिव्ह आल्यामुळे यांचेसह इतर १० पॉझिटिव्ह सदस्य गृह विलगिकरणात असून खासदार नवनीत राणा सर्व सदस्यांची जातीने काळजी घेत आहे.

संपर्कात आलेल्या सर्वांनी आपल्या टेस्ट करून घ्याव्या व काळजी घ्यावी तसेच शासन निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन आमदार रवी राणा - खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

आमदार रवी राणा यांचे निवासस्थानी मनपा द्वारे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. व परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. मनपा आयुक्त रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निकम व त्यांच्या टीम ने आमदार रवी राणा यांचे निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे.

https://youtu.be/JuQ5L-niZsE