कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक उपाय योजनांचे सातत्य हवं – देवयानी फरांदे

Update: 2020-07-17 02:41 GMT

नाशिक - जुने नाशिक पुर्ण लाॕकडाऊन केल्यानंतर मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपाययोजनांची पाहणी केली. दाट लोकवस्तीमुळे या भागात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आमदार फरांदे आग्रही होत्या. कोरोना विषाणूची सामुहिक संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सहा दिवस जुने नाशिकचा पुर्ण परिसर प्रतिबंधीत केलाय. हा परिसर सील झाल्यानंतर या भागाची त्यांनी फेरफटका मारून पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक उपाय योजनांचे सातत्य गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

https://youtu.be/Bs01koRbvUE

Similar News