आता गुरुजींना बोला ऑनलाइन #ThankaTeacher

Update: 2020-09-04 09:46 GMT

सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सोय करुन दिली असली तरी काही शिक्षक हे त्यातही नाविण्य आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. विवीध उपक्रम राबवत आहेत. शिक्षकांच्या याच मार्गदर्शनामुळे आज अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिनानिमीत्त "थँक अ टीचर" ही मोहीम राबवण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे.

या संदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं असून, यात त्यांनी ‘शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यात जी प्रगती झाली. ती व्यक्त करण्यासाठी #ThankaTeacherही मोहीम ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे राबवण्यात येणार आहे.’ असं म्हटलं आहे.

Similar News