आदिवासी भागातील शाळांसंदर्भात मेधा पाटकर यांनी घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट

Update: 2020-07-15 23:37 GMT

सामाजीक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेऊन नर्मदेच्या पट्टय़ातील आदिवासी भागातील शाळांच्या संदर्भात, विशेषत: ऑनलाइन शिक्षण, माध्यान्ह भोजन या समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले. ज्या भागात करोना रुग्ण नाहीत, अशा भागांतील शाळा सुरू करायला काही हरकत नाही, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

नंदुरबार जिल्ह्य़ात शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती आहे. फार मोठय़ा प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव तिकडे नाही. धडगाव तालुक्यात फक्त एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिथे करोना नाही, तिथे शाळा सुरू कराव्यात, या मागणीवर बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन वर्षां गायकवाड यांनी दिल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

Similar News