'प्रभू श्रीराम हे इमाम ए हिंद आहेत' - एड. शाहीन परवेज

Update: 2020-07-27 00:32 GMT

५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात काही मुस्लिम महिलांनी रामासाठी राख्या बनवल्या आहे. या बाबत बोलताना मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या महिला संयोजिका अॅड. शाहीन परवेज म्हणाल्या की, “प्रभू श्रीराम हे 'इमाम ए हिंद' आहेत. भारताची ओळख त्यांच्यामुळेच आहे. आम्ही सुरुवातीपासूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या बाजून आहोत. राम मंदिर निर्माणासाठी राम मंदिर ट्रस्ट माझ्या शुभेच्छा आहेत. पंतप्रधान मोदी हे भूमिपूजनाच्या सोहळ्याला येणार असल्याने त्यांचेही अभिनंदन.” असं शाहीन परवेज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या राख्या ३ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी अयोध्येत रामललाच्या हातावर बांधाव्यात असं आवाहन शाहीन परवेज यांनी केलंय. श्रीकृष्णाची फोटो आणि मोरपीसांनी सजवलेल्या या राख्यांवर महिलांनी 'जय श्रीराम' लिहित आपली श्रद्धाही व्यक्त केली. या राख्या बनवताना परवेज यांना रेश्मा, नीलम, शबनम, फरहीन आणि फरजाना या महिलांनी साथ दिली.

Similar News