महिलांनो आता तुमची सुरक्षा तुमच्याच हातात, अत्याचार रोखण्यासाठी सरकारचे नवे अॅप

Update: 2020-08-15 05:02 GMT

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या विद्यमाने तयार केलेल्या 'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हॉयलन्स' या वेब ॲपचे अनावरण राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

यावेळी बोलतान मंत्री यशोमती ठाकूर यांनी “स्मार्ट फोनचा वापर महिला मोठ्या प्रमाणावर करीत असून, 'स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हॉयलन्स' हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि वेळप्रसंगी संबंधित महिलांना मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल.” असा विश्वास व्यक्त केला आहे.

स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हॉयलन्स हे वेब ॲप असून https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाइलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमध्ये जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून, वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तत्काळ मदत करू शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून, ॲपद्वारेच त्यांना दूरध्वनी करता येईल.

Similar News