संवेदनशील प्रशासकीय अधिकारी नीला सत्यनारायण

Update: 2020-07-16 08:57 GMT

नीला सत्यनारायण मॅडम यांचे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दु:खद निधन झाल्याची बातमी समोर वाचली. माझ्यासाठी खूप धक्कादायक बातमी आहे. मध्यंतरीच्या काळात मॅडमनी त्यांना लिहिलेल्या पत्राचे संकलन करून ठेवले होते. या पत्राचे पुस्तक लिहिण्यास घेतले आहे असे सांगितले होते.

‘पत्रांचा अल्बम – ताजा कलम; या नावाने पुस्तक लवकरच प्रकाशित होईल यावर आमची फोनवर बराच वेळ चर्चा झाली होती. मॅडम सोबत माझा संबध आला तेव्हा त्या गृहखात्याच्या सचिव होत्या. माझ नुकतच एमएसडब्ल्यू पूर्ण झाल होत. शिवाजी साळुंके हे पैठणच्या कारागृहात कैदी त्यांच्या मुलीच्या शिक्षणाच कस होईल या काळजीत होते. तेव्हा चाइल्डलाइनच्या माध्यमातून मॅडमना भेटून ह्या मुलीच्या शिक्षणासाठी अपील केले होते. मॅडमनी फक्त एका मुलीला नाहीत तर त्यावेळी शिवाजी साळुंके यांच्या सोबत अजून दोन कैदी होते त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठीही पूर्ण मदत केली होती. यातील शिवाजी साळुंके यांची मुलगी वकील झाली.

२००३ ते २००६ ह्या कलावधीत मी मॅडमना जेव्हा कधीही एखाद्या बालकांच्या बाबतीत मदत मागितली तेव्हा मॅडमनी मला कधीही नाही म्हटलं नाही. माझ पहिलं पुस्तक बालहक्क हे प्रकाशित झाल तेव्हा आमच्या दोघीमध्ये अर्धा तास गप्पा झाल्या होत्या. माझ भरभरून कौतुक करत होत्या. ह्या पुस्तकात गरोदर कैदी स्त्रियांच्या बाळाचे हक्क याप्रकरणाचा विशेष उल्लेख त्यांनी मुंबईच्या एका कार्यक्रमात केला होता. माझ्या कामाची माहिती मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून ‘दूरदर्शनाला माझी पहिली मुलाखत त्यांनी घडवून आणली होती.

‘एक पूर्ण एक अपूर्ण’ त्यांच्या पुस्तकावरच्या चर्चा.. २००३ पासून अनेक वेळा संपर्क आला. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हाचा फोन कॉल ... तीन चार महिन्यापूर्वी एका कामानिमित्त बोलणं झाल होत तेव्हा तुझा कामाचा चढता आलेख पाहून फार समाधान वाटतं ही भावना व्यक्त केली होती. त्याच्या सोबत कैदयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेले काम, इतर कामाच्या आणि आमच्यामधील झालेला वैयक्तिक संवाद कायम स्मरणात राहिलं. एखाद्या मुद्द्यावर जास्त चर्चा झाली की, रेणुका तू अजून लहान आहेस. बाईपण आव्हान आहे.... यावर आमचा संवाद थांबायचा. किती तरी आठवणी आहे ह्या 16-17 वर्षाच्या...

तुम्ही अस जाण अपेक्षित नव्हतं. मान्यही नाहीये.

-रेणुका कड

Similar News