‘निवृत्ती काशिनाथ देशमुख हाजीर हो...’ इंदोरीकर महाराजांची आज न्यायालयात सुनावनी

Update: 2020-08-07 01:28 GMT

प्रसिद्ध कर्तनकार निवृत्ती देशमुख-इंदुरीकर म्हणजेच इंदौरीकर माहाराज यांनी काही दिवसांनपुर्वी आपल्या कीर्तनात सम विषम तीथीवर संबंध आल्यास मुलगा, मुलगी होते असे व्यक्तव्य केले होते. त्याची आज 7 आँगस्टला संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होनार आहे. त्यांना न्यायालयाने हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत.

निवृत्ती देशमुख यांच्यावर PCNDT कायद्याच्या कलम 22 व 28 अनव्ये संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्या नंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पाठींबा दिलेला आहे. मात्र सध्या निवृत्ती देशमुख कायद्याच्या कचाट्यात अडकलेले पाहायला मिळत आहेत. निवृत्ती देशमुख यांच्यावर असणारे गुन्हे मागे घेतले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून टोकाचे आंदोलन करु, आणि वारकरी साप्रंदायाला वेठीस धरणाऱ्या शासनाला व नास्तिकांना त्यांची जागा दाखवुन देऊ, असा इशारा विविध संघटनांकडून दिला जात आहे.

दरम्यान, संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी ही तक्रार दाखल केली होती.

https://youtu.be/Jkl0e1KSt2I

Similar News