DSK च्या मुलींचा कोरोनाने मृत्यु, अंत्यविधीला नाही तेराव्याला जाता येणार

Update: 2020-08-12 01:50 GMT

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची कन्या अश्विनी देशपांडे यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे. डी.एस.के आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह मुलगा शिरीषही सध्या कारागृहात असल्याने अंत्यसंस्काराला कुणी उपस्थित राहू शकलं नाही. आता कोर्टाने या तिघांना मुलीच्या तेराव्यासाठी काही तास घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १६ ऑगस्ट रोजी त्यांना तेराव्याचे विधी करण्यासाठी कारागृहातून सोडण्यात येणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

डी.एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता. तब्येत ढासळल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

कोरोनाच्या प्रतिबंधामुळे अंत्यसंस्कारासाठी कारागृहात असणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांतील कुणालाही अश्विनी देशपांडेंच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता DSK यांच्या वकिलाने किमान 13 व्याच्या विधीसाठी सूट मिळावी म्हणून कोर्टात अर्ज केला होता.

Similar News