जेव्हा आजी म्हणते पूजेपेक्षा लेक महत्वाची...

Update: 2020-03-26 09:45 GMT

तब्बल १३ वर्षांनी गावी जाण्याचा योग आला ते ही फुल फॅमिली भन्नाट असा अनुभव. गावी जाताना मी अत्यंत भारावून गेली होती. कारण मुंबईत जन्म झाला आणि मुंबईतच वाढलो, कधी गावाकडे जाण्याचा योग आला नाही. होळीच्या निमित्ताने अचानक प्लान झाला उद्या गावी जायचं म्हणून तर मग काय फुल फॅमिली निघालो. (पप्पा-आई, दादा-वहिनी, लहाना भाऊ त्याची बायको आणि 2 वर्षांचा माझा भाचा) घरचीच गाडी असल्यामुळे पटकन गावी पोहचलो.

माझं गाव #अहमदनगर... डोंगराळ भाग... घाटावर आमची वस्ती... जसजसा गावाचा रस्ता सुरु झाला तसं पप्पा आणि माझे काका कुठे काय आहे हे सांगत होते. मी आपली डोळ्यात निसर्गाच्या सौंदर्याचे क्षण कैद करत होती. गावचे रस्ते घाट बघून व्हा व्हा क्या नजारा हे हेच शब्द तोंडातून येत होते. खरं तर मी खूप भारावून गेली होती. निर्मळ निसर्गाच्या ओटीत बसलो की काय असं वाटत होतं. ते नयनरम्य दृश्य अजूनही माझ्या नजरेत कैद आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे कमी लोक वस्ती आणि त्यात शुद्ध हवेचा नुसता कालवा सुरु होता.

गावी पोहचल्यानंतर आजी घराबाहेर आली आम्हा सगळ्यांना मोठ-मोठे मुक्के दिले (पप्पी घेतली) आजीची पप्पी घेण्याची स्टाईटलच खूप वेगळी आहे. आमची आजी खूप कठोर वाटते पण तशी ती नाही खूप मयाळू आहे. आज्जी, मम्मी आणि मी तीन पिढ्या असूनही आजी ने आमच्या खापर परतुंड पाहिली आहे. आजी आणि माझ्यात तीन पिढ्यांचं अंतर आहे ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो. तरीही माझे विचार तिला पटतात आणि तिचे मला...

 

मी आठवीला असताना आज्जी आमच्या घरी आली होती. कसली तरी पूजा होती आणि नेमकी त्या दिवशी मला मासिक पाळी आली. तर मग काय मला चक्क पूर्ण दिवस बाहेर ठेवलं होतं. संपूर्ण पूजा होऊ पर्यंत मी आपली बाहेर बसून होते. मग काय पूजेला सगळे होते पण मी नव्हती. आजीने आईला विचारलं प्रियंका कुठे आहे त्यावर आई म्हणाली, तिला पाळी आली आहे म्हणून तिला बाहेर बसवलं आहे.

हे ऐकताच आजी खूप चिडली आणि म्हणाली तुम्ही लोक येडे का खुळे... पाळी आली म्हणून तिला पूर्ण दिवस बाहेर ठेवलं ती लेक आहे घरची घ्या तिला घरात पूजेपेक्षा #लेक महत्त्वाची आहे. ही असली प्रथा परंपरा मी मानत नाही असं म्हणून मला आजी घरात घेऊन आली आणि घरात गेल्या गेल्या जेव्हा मी रिलॅक्समध्ये बसले कसलं भारी वाटलं पण मला घरात काय झालं हे कळलं नाही की आजीने घरात सगळ्यांना ओरडा दिला. खरंतर त्यावेळी नाही कळालं मला मात्र त्यानंतर जेव्हा कळालं तेव्हा आजी गावी गेली होती तिला आणि तिच्या विचारांना सलाम करावासा वाटला.

होळीच्या निमित्ताने गावी जाण्याचा योग आला गावच्या घरी पोहचल्यानंतर आज्जीला मोठी जादू की झप्पी दिली बरं वाटलं. मला आजीचा हा स्वभाव खूप आवडला. आजी तशी तिच्या सूनांना खूप ओरडते तिला सगळं परफेक्ट पाहिजे असत म्हणून...

90 वर्षांची माझी आजी आजही ठणठणीत आणि तिच्या आवाजात तो कणखरपणा अजूनही कायम आहे. खरं तर प्रत्येक घरात असा व्यक्ती असावा.

-प्रियांका आव्हाड

Similar News