सोनं खरेदी करताय.. जरा थांबा

Update: 2020-03-18 08:05 GMT

काल सोन्याच्या भावाने ३९,२२५ रुपयांचा निचांक गाठलेला असताना आता पुन्हा सोन्याने उसळी घेतली असून आज ४०,००० रुपयांचा आकडा पार केलेला आहे. (Gold Prices Rise) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये प्रचंड उलथापालथ होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत सामान्य वर्गाने सोन्याची खरेदी करणं फारच जिकरीचं ठरू शकतं. त्यामुळे बाजाराचा आढावा घेत सोने खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल.

कोरोना व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येचा शेअर बाजारावर स्पष्ट परिणाम होताना दिसतोय. सोन्याच्या खरेदीबाबत नागरिकांमध्ये अनेक भ्रम निर्माण झाले असून किमतीतील चढ-उतार पाहता खरेदी करावी की नाही हा गंभीर प्रश्न आहे. सोबतच वाढलेल्या किमतीमुळे सोन्याची खरेदी विक्री कमी झालीय. सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे भावही उतरताना पाहायला मिळतोय.

शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर गडगडताना सोने- चांदीतील गुंतवणुकीत अधिक हालचाल होताना दिसतेय. परिणामी सोन्याच्या किमतीमध्येही चढउतार पाहायला मिळतो आहे. ९ मार्च रोजी सोन्याने सर्वाधिक ४३५०० रुपयांचा आकडा गाठला होता तर १७ मार्चला ३९२२५ रुपयांचा निचांकी आकडाही पाहिला आहे. येत्या काही दिवसात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर शेअर बाजाराची आणि सोन्याच्या किमतीचा हालचाल अवलंबून आहे.

आर्थिक बाजारात अस्थिरतेच्या काळात शेअर मधील गुंतवणुकीपेक्षा सोने चांदीमधील गुंतवणुक अधिक फायदेशीर मानली जाते. परिणामी सोन्या चांदीच्या भावातही आपल्याला चढउतार दिसतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची स्थिती

आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव 0.79 टक्क्यांनी म्हणजेच 11.95 डॉलरने घसरला. त्यामुळे मंगळवारी (17 मार्च) सोन्याच्या भावात 480 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे भारतात सोन्याचा भाव 39 हजार 037 रुपये प्रति तोळा पाहायला मिळाला. मंगळवारी चांदीचा भाव 1.04 टक्क्यांनी घसरुन 35 हजार 831 रुपये प्रति किलो पाहायला मिळाला.

Similar News