सावित्री माईंचा जीवनपट आठवताच ही नकारात्मकता दूर होऊन जाते-दुर्गा गुडिलू

Update: 2020-01-01 15:32 GMT

सावित्रीमाईने मनुस्मृतीच्या नियमाविरुद्ध जाऊन शूद्र - अतीशुद्र समाजाला, स्त्रीला शिक्षणाची दारे उघडली त्याचबरोबर तिने उच्चनीचतेच्या विषम सामाजिक व्यवस्थेविरुद्ध प्रहार केला.या जाती व्यवस्थेचा एक भाग असलेल्या जातपंचायती विरुद्ध लढताना सावित्रीमाईंचा संघर्ष मला प्रेरणा देत राहिला आहे.

वैदू समाजाच्या जात पंचायती विरोधात लढताना आणि नंतर ती पंचायत बरखास्त करताना मी आणि माझ्या कुटूंबाने जे सहन केले आहे.आणि आम्हाला संघर्ष करण्याचे जे बळ मिळाले त्याची प्रेरणा सावित्रीमाई आहे.

मानवी हक्क संरक्षण करू पाहणाऱ्या माझ्या सारख्या तमाम कार्यकर्त्यांना सावित्रीमाई या नेहमी मार्गदर्शक - प्रेरणा राहिलेल्या आहेत.

जात पंचायती विरोधात लढताना लोकांचे शाब्दिक प्रहार, सामाजिक बहिष्काराची भाषा, प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत आपल्या विरुद्ध राग पाहून कधी कधी हा लढा नको असे मन म्हणायचे, पण सावित्री माईंचा जीवनपट आठवताच ही नकारात्मकता दूर होऊन जोमाने कार्यास लागावे असे वाटायचं.सावित्री माईंनी तर प्रत्यक्ष सामाजिक बहिष्कार अनुभवला.मला तर केवळ धमकी दिली जातेय.कार्य करत गेल्यानंतर धमकी देणाऱ्या पुरुषी मानसिकतेच्या लोकांनी माझे नेतृत्व स्वीकारले.भारतातील तमाम स्त्री वर्गाला मिळणाऱ्या नेतृत्वाच्या संधीच खरे श्रेय माझ्या या आईला जाते .सावित्री माईला.

३ जानेवारीला सावित्रीमाईचा जन्मदिवस आहे त्यांना माझे अभिवादन

-दुर्गा गुडिलू वैदू समाज युवा समिती

 

Similar News