स्त्री शिक्षणाचा प्रसार -सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)

Update: 2020-01-01 14:58 GMT

सावित्री बाई फुले यांच्यामुळे आपण हिमतीने,आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे जगायला शिकलो.. शिक्षण घेऊ शकलो. त्यांच्या त्यागाचा आदर आणि सावित्रीबाईंच्या प्रेरणेला स्मरण म्हणून 3 जानेवारी हा दिवस मी साजरा करणार.

दोन वर्षांपूर्वी मी एक कल्पना मांडली की, 3 जानेवारीला आपण ऑफिस, कॉलेज किंवा घरा मध्ये सावित्री बाई जश्या कपाळावर आडवं कुंकू ( आडवी चिरी ) लावायच्या तशी चिरी आपण लावूया. ही माझी कल्पना सर्वांनी उचलून धरली.कोणतीही चळवळ सुरू होताना ती छोटीच वाटते. पण काही वर्षांत ती एक विशाल संघटित स्वरूप धारण करेल असा मला विश्वास वाटतो.

सावित्री बाईंचे स्मरण म्हणजे,प्रत्येक स्त्री पर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहचायला हवं. प्रत्येक कुटुंब या शिक्षणाचा आनंद घेऊ शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ही चळवळ सर्वांपर्यंत पोहचली असे मी म्हणेन.

-सोनाली कुलकर्णी अभिनेत्री

Similar News