आत्महत्या केलेल्या मुलांची आकडेवारी सरकारकडे नाही, या महिला खासदाराने विचारला प्रश्न

Update: 2020-09-23 10:10 GMT

डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये डिजीटल माध्यमांची सोय उपलब्ध नसल्याने नैराश्येतून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातील माहिती सरकारने द्यावी अशी मागणी केली. यावर शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

कनीमोळी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, समाजामधील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सध्याच्या महामरीच्या काळामध्ये शिक्षण मिळावं म्हणून सरकार संवेदनशील असून प्रयत्न करत आहे. शिक्षण मंत्रालयाने मनोदर्पण नावाची योजना सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक स्वास्थासंदर्भात आधार देण्याचे आणि भावनिक दृष्ट्या पाठिंबा देण्याचे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये एखाद्याला टेली काऊन्सलिंगच्या माध्यमातून मदत करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. एनसीईआरटीने यासंदर्भात प्रग्याता नावाच्या अहवालात सविस्तर निर्देश दिलेले आहेत. यामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात सविस्त माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसंदर्भातील कोणतीही माहिती शिक्षण मंत्रालयाकडे नाही.”

कोरोना लॉकडाऊन काळात किती मजुरांचा मृत्यू झाला? माहित नाही. किती कोरोनायोद्धा डॉक्टर मृत्युमुखी पडले? डेटा नाही. किती शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या? माहित नाही. यासर्व प्रश्नांवर केंद्र सरकारचे एकाच उत्तर ठरलेले आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

Similar News