Hathras Gangrape: कुटुंबियाना न सांगताच पीडितेवर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

Update: 2020-09-30 06:43 GMT

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला.

मात्र, गावकरी आणि पीडित कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या परवानगीनेच झाल्याचे पोलिस अधिकारी सांगत असले तरी पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

पीडितेच्या वडीलांच्या म्हणण्यानुसार

“आम्हाला घरात बंद करुन ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी पोलीस डेड बॉडी घेऊन आले. आम्हाला कळलं ही नाही नक्की कुणाची बॉडी आहे. घराचे दरवाजे बंद करुन बाहेर मोठ्या प्रमाण पोलीस उभे होते.”

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. चार नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. एवढेच नाहीतर तिची जीभ छाटली, कंबरेचे हाडही मोडले. बोलता येत नसतानाही या जांबाज तरुणीने इशाऱ्यावरून जबाब दिला आणि त्यावरून पोलिसांनी चारही बलात्काऱ्यांना बेडय़ा ठोकल्या आहेत.

Similar News