समलैंगिक संबंधाचा त्रिकोन!

Update: 2019-12-23 13:10 GMT

( एखादी कलाकृती आपल्या अस्तित्वाची जाणं करून देऊ शकते का..? ह्यां प्रश्नांच उत्तर "हो" अस देणा-या नाटकाच नाव आहे "गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर' ..!!)

तसा नाट्यक्षेत्राशी आपला दूरदूर पर्यंत संबध नाहींचय पण आयुष्यात विविध भूमिका साकारतांना करावा लागणारा "लटका अभिनय" आणि आप्तेष्टांची सुरू असलेली नाटकं बघतांना एखाद्या फिरत्या रंगमंचावर वावरत असल्याचा भास नेहमीच होतं राहतो , मात्र योगायोगाने आज खरंखुरं नाटक , त्यातील पात्र आणि त्यांचा खराखुरा अभिनय बघण्याचा संधी मिळाली आणि त्या नाटका बाबद लिहण्याचा मोह आवरला नाही .तसं या आधीही अनेक नाटकं आणि कसदार दमदार अभिनय बघितले मात्र आयुष्याच्या नाटकाची खऱ्याखुऱ्या नाटकाशी बेरीज वजाबाकी करावी अस वाटावं अस हे नाटक आहे.

पडदा उघडतो... आणि दार ठोठावण्याचा काळजात धडकी भरविणाऱ्या आवाजाने नाटकाची सुरवात होते, सोबत तुम्ही नाटक बघायला आलयत या भानावरही येता आणि अभिनेत्रीचा पहिलाच संवाद तुम्हाला खिळवतो ,"

गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर' नाटकाचं हे नाव वाचून क्वचितच एखाद्या बुद्धिबळ खेळणाऱ्याला नाटकाचा विषय लक्षात येईल पण तीही शक्यता कमीच आहे म्हणा... म्हणून हे नाटकं स्वतःच बघायला हवं, तेव्हा कळेल की नाटकाचा विषय किती संवेदनशील आहे आणि एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीच शारीरिक शोषण केलं जातं आणि त्यामुळे होणाऱ्या घुसमटीची कोंडी कशी फुटते?

"गावच्या हद्दी" ओलांडून परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आलेल्या शेकडो तरुणींची ही कहाणी आहे , आणि त्या तरुणींचीही ज्या आपला देह पुरुषांकडून होणार शारीरिक शोषणाच्या बचावासाठी स्त्रियांच्या सहानुभूतीला बळी पडून स्वतःच समलैंगिक संबंधात झोकून देतात आणि स्वतःच्या आयुष्याच्या शेवटाची सुरवात करतात.हो बरोबर वाचलं तुम्ही "स्त्रियांकडून होणार शोषन "!

गावाकडून आलेली तरुणी आणि तिला सहारा आसरा देणारी स्त्री दोघींमध्ये अनवधानाने झालेले शारीरिक संबध त्या दुबळ्या तरुणीच स्वप्नंच नाहीतर तिचं आयुष्यही कस उध्वस्त करते हे बघतांना तुम्हाला कळत की आपण किती स्वातंत्र्यात जगतोय .

एकीकडे समलैंगिक संबंधाच टोक दाखवणार हे नाटक दुसरीकडे सरसकट पुरुष जातीला वासनांध असा लागलेला कंलकही पुसण्याचा प्रयत्न करतं. नाटकातील नायक रघू ,जो वैश्येच्या घरात वाढलेला असतो , स्त्री देहाचे लचके तोडुनच शारीरिक भूक भागविणारे कुत्रे त्यानं अगदी लहानपणापासून पाहिलेली असतात मात्र तरीही स्त्रीला तिच्या देहापेक्षा मनावर प्रेम करून जिंकन्यावर त्याचा विश्वास असतो , तर नायिका निशा ही ग्रामीण भागातून येऊन IT क्षेत्रात नोकरी करत गावाकडच कुटुंब सांभाळणारी तरुणी आहे जी प्रेम आणि वासनेच्या गर्तेत सापडलीय ,तर व्हिलन साकारणारी मुग्धा एक स्त्री असूनही जिला स्त्री देह उपभोगायची चटक लागलेली असते आणि जी शेवट पर्यंत पुरुष जातीचा तिरस्कार करत आपल्याकडील पावर्स चा गैर उपयोग करत सगळं संपवून नाटकाचा शेवट करते . या तीन पात्रांच्या भोवती फिरणार नाटक आणि रघू ,निशा,मुग्धाचा त्रिकोण आपल्या आयुष्याच्या चौकोणात फिट्ट बसल्याच नकळत आपल्या लक्षात येत.तीनही पात्र ओळखीचे आहेत पण आपण त्यांना जगासमोर का आणत नाही?, ही सल सतत मनाला टोचत राहते ती नाटक संपल्या नंतर तुम्ही जो पर्यंत एकांतात असता तो पर्यंत...!!

पिंपरी चिंचवड मधील तरुण नाट्य दिग्दर्शक ,लेखक आणि नाटकातील मुख्य कलाकार असलेले अमृता ओंबळे आणि प्रभाकर पवार ने घाम आणि रक्त ओतून स्वतःच उभारलेल्या पैसे रंगमंचावर सादर केलेल्या ह्या नाटकात सुजाता कांबळेनेही अंगावर येणारा अभिनय करत खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड मधील सांस्कृतिक चळवळीचा पाया भक्कम होत असल्याची ग्वाही दिल्याने, यापुढे आम्हा पिंपरी चिंचवडकरांना सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पुण्यात रांगा लावायची गरज पडणार नाही असा विश्वास वाटतो.

अमृता प्रभाकर आणि पैस रंगमंचच्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देत

माय बाप नाट्य रसिकांनी या कलाकारांना आशीर्वाद द्यायला हवी हीच सदिच्छा व्यक्त करतो

-गोविंद वाकडे

Similar News