गरिबीची आणि कर्तव्याची जाण असणारी "आजी"

Update: 2019-12-25 13:25 GMT

मित्रहो नमस्कार. मित्रहो आज आपण समाजात होत असणारे बदल पहात आहोत. रोज वर्तमान पत्र वाचुन मन सुन्न होते. लहान लहान मुलीवर होणारे आत्याचार पाहुण असे वाटते कि आपले संस्कार कमी पडत आहेत. आपण शाळेतील शिक्षणावर भर देत आहोत. पण शाळेबाहेर सामाजिक रूढी,परंपरा,शिस्त चांगले वाईट, देशसेवा जपण्याचे शिक्षण देण्यात कोठेतरी मर्यादा पडलेल्या दिसतात.

आपल्या वागण्याने व घरी हे संस्कार आवश्यक वाटु लागले आहे. काल माझ्याकडे श्रीमती शशीकला कोकर आजी भेटण्यासाठी आल्या होत्या. यापुर्वी त्या मला माझ्या वाढ दिवसाला भेटल्या होत्या. तेंव्हा त्यांनी मला वीस हजार रूपयाचा चेक दिला होता. पण त्यांचे पेन्शन फक्त १२०० असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी तो चेक बॅंकेत टाकला नाही. त्यांना पण वाटले की हेच कारण असावे. काल आपल्या मुलीला घेऊन आल्या व पुन्हा चेक घ्या म्हणुन आग्रह धरून बसल्या. मी खुप समजावले. मग त्यांनी सांगितले मला माझ्या मिस्टरांची पेन्शन मिळते. ती महिन्याला बारा हजार आहे. मी चुकून १२०० सांगितले. आता माझा चेक घ्याच.

मी समजावत होतो कि आम्हाला बरेच जण मदत करतात. आपण एका गरीब कुटूंबातुन आला आहात तर पैसे देऊ नका. पण शशिकला आईंनी हट्टच धरला कि मी आता एक लाख रू. देणार. ते घ्यावेच लागतील. खुप साध्या. लहान घरात राहणाऱ्या आई. पण आपल्या पेन्शनचा अर्धा हिस्सा समाज कार्यास देतात. किती हे मोठे विचार आहेत. चांगला विचार रूजण्यासाठी शिक्षण किंवा श्रीमंतीच असावी लागते असे नाही. लहानपणीचे कुटूंबातील संस्कार खुप महत्वाचे असतात. जे शशीकला आईंजवळ असल्याने त्या समाज सेवेचा विचार करू शकल्या. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. आज ही जाणीव कमी होत चालली आहे. आपण फक्त हक्कावर भर देत आहोत. शशीकला आई सारख्या कर्तव्य निष्ठ आई समाजाला मार्गदर्शक ठराव्यात. समाजात अशी माणसे असल्याने समतोल साधला जात आहे.

 

- तात्याराव पुंडलिकराव लहाने

Similar News