'वर्ल्ड्स बेस्ट मॉम' बनणारा 'हा' तरुण कोण आहे?

Update: 2020-03-08 09:00 GMT

'आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे' औचित्य साधून बेंगळुरूच्या 'Wempower' या कार्यक्रमात पुण्यातील रहिवासी असलेले आदित्य तिवारी (Aaditya Tiwari) यांना "जगातील सर्वोत्कृष्ट आई" म्हणून गौरविण्यात येणार आहे.

२०१६ मध्ये आदित्यने 'डाऊन सिंड्रोम' असलेल्या एका लहान मुलाला दत्तक घेतले. अवनिश असं दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव आहे. अवनिशला त्याच्या आईने अनाथ आश्रमच्या बाहेर सोडुन दिले होते. आदित्य तिवारी हे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होते. त्याने वयाच्या 28 व्या वर्षी मूल दत्तक घेण्याचे ठरविले. ज्यावेळी त्याने अवनिशला दत्तक घेण्याचे ठरवले तेव्हा तो दोन वर्षाचा होता.

Courtesy : Social Media

आदित्यच्या या निर्णयामुळे त्याच्यावर अनेक बंधने घालण्यात आली. त्याला अनेक लढाया लढाव्या लागल्या होत्या. अवनीशच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर आदित्यने आपली नोकरी सोडली आणि पालकांना मार्गदर्शन व खास मुलांना प्रोत्साहन देण्यावर त्याने भर दिला. बाप-मुलाच्या या जोडीने आत्ता पर्यांत 22 राज्यांचे दौरे केले आहेत आणि सुमारे 400 ठिकाणी चर्चा आयोजित केल्या आहेत.

"आम्ही जगभरातील १०,००० पालकांशी जोडले गेलो आहोत.आम्हाला एका परिषदेत भाग घेण्यासाठी आणि बौद्धिक दिव्यांग मुलांचे संगोपन करण्याच्या मार्गांवर प्रकाश टाकण्यासाठी जीनवा वर्ल्ड इकॉनोमिक फोरमने आमंत्रित केले होते." असं आदित्यने सांगितलं.

अविनाश आता बालवाडी मध्ये शिकत आहे नृत्य, संगीत, छायाचित्रण आणि वाद्य वाजवण्याचा आनंद घेत आहे. अवनीशच्या हृदयात दोन छिद्रही होते. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता अनवीश बरा झाला.

Courtesy : Social Media

डाऊन सिंड्रोममुळे समाजात पेच निर्माण होईल म्हणून त्याच्या पालकांनी त्याला हा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता त्याच्या कथेद्वारे त्यांनी अनेक ठिकाणी आणि मंचांवर मुलांना दत्तक घेण्याविषयी प्रेरणादायक चर्चा केली आहे. आदित्य तिवारीने आईच्या प्रेमाचे एक अद्भुत उदाहरण प्रस्थपित केले आहे.

Similar News