‘SHE’… महिला पोलिसांचं विभत्स चित्रण खरं की खोटं?

Update: 2020-03-27 08:10 GMT

या lockdown च्या काळात घरात सतत नेटफ्लिक्स चालू असते त्यामुळे आजकाल " she " नावाची सीरियल सध्या भारतात टॉपमोस्ट आहे, नंबर वन आहे आणि ती Mumbai Police मध्ये काम करणाऱ्या महिला पोलिस कांस्टेबल वर आहे हे समजले.

एका ओळीत स्टोरी लाइन सांगायची झाली तर ड्रग्सचे रैकेट उध्वस्त करण्यासाठी या महिला पोलिस शिपाई ला "under cover" म्हणून Prostitute म्हणून काम करते आणि शेवटी ती त्या डॉनसह शय्या सोबत करते. ही वेब सीरीज संपल्यानंतर बराच वेळ सुन्न वाटत होते .

मुंबई मध्ये काम करणाऱ्या बहुतांशी महिला पोलिस या ग्रामीण भागातून येतात.

ग्रामीण भागात आज ही मुलींना करियर करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. महिला पोलिस म्हणून रुजू झाल्यावर त्यांना घरी आणि कर्तव्याच्या ठिकाणी येणारे प्रोब्लेम हा एक स्वतंत्र Phd चा विषय आहे.

कित्येकदा लग्नाच्या मार्केटमध्ये बायको पोलिस खात्यातली नको असते. लग्नानांतर संशयाच्या सुईवर सतत तिला राहावे लागते. चांगला शिकलेला, ब्रॉड माइंडेड नवरा मिळाला तर ठीक अन्यथा पारंपारिक बुरसटलेल्या विचारसरणीच्या वातावरणात घर आणि काम सांभाळने तिच्यासाठी फार तारेवरची कसरत असते, त्यात कर्तव्याच्या ठिकाणच्या पुरुषी वृत्तींना तोड देणं अजुन वेगळे, आधीच तिचे अनेक प्रोब्लेम असताना आणि त्यांना फेस करत तिचे Struggle चालू असताना तिचे 'असे' चित्रीकरण अजून त्यात वाढ करणार आहे.

आता लॉक डाउनच्या काळात ही वेब सीरीज ग्रामीण भागातही चवीने बघितली जाणार, "आयला मुंबईला पोलिसमध्ये असलबी काम करावं लागतंय" यावर चर्चा होणार. खास पुरुषी माहितीची देवाणघेवाण होणार. या वेळी सुट्टीत गावी येणाऱ्या महिला पोलिसला तू मुंबईत काम करते होय असे म्हणून खालपासून वर पर्यंत बघितले जाणार, इतकेच काय एखाद्याची बायको पोलिस शिपाई असेल तर, बघ बाबा तुझी बायको नक्की काय करते असे आडुन आडून विचारले जाणार.

घरातल्या संशयी नवऱ्याने ही सीरीज बघितली असेल तर. घरात प्रत्येक वेळी उशिरा पोहोचल्यावर नवऱ्याच्या संशयी नजरेचा सामना करावा लागणार. क्राइम ब्रांच/ DB /Narcotics मध्ये काम करणाऱ्या WPC ना तर त्यांचे पुरुष/ स्त्री दोन्ही सहकार्यांकडून Direct -Indirect गॉसिप ना अजून तोंड द्यावे लागणार.

आधीच स्त्री ही दुय्यम आणि उपभोग्य वस्तु असल्याची आपली भारतीय मानसिकता अशा सर्व 'इमेज' Web Series ने निर्माण केल्यामुळे अजुन घट्ट पाळेमुळे रोवणार आहे. आता काही जणांना वाटू शकत असे काही टीव्ही मुळे समाजात फरक पडत नाही. हे फिक्शन आहे , Cinematic लिबर्टी आहे. मात्र, या सर्व गोष्टी कदाचित परदेशात होत असतील. प्रत्यक्षात भारतीय लोक अजुन तेवढे प्रगल्भ नाहीत.

आजही टीव्ही, प्रिंट मीडिया आणि आता सोशल मीडिया, Whats aap चा त्यांच्या वर खुप प्रभाव आहे.

महिला पोलिसांवर टीव्हीचा प्रभाव दाखवयचा झाला तर, गेल्या काही वर्षात महिला पोलिस सर्रास लो वेस्ट युनिफॉर्म वापरत आहेत. त्यांच्या यूनिफार्म च्या स्लीव्स देखील कित्येकदा कमी असतात. लो वेस्ट युनिफॉर्म नाही आहे हे सांगून ही सर्वत्र low waist वापरला जातोय. अगदी academy पण. कारण, काही वर्षापूर्वी एका सीरियलमधील अभिनेत्रीने अंगप्रत्यंग दाखवण्यासाठी घातलेले टाइट लो वेस्ट युनिफॉर्म.. जर एखादया सिरियल /सिनेमा फैशन चे एवढे अंध अनुकरण होऊ शकते तर मानसिकतेचे अनुकरण व्ह्यायला कितीसा वेळ लागणार किंबहुना ते होतच.

8 मार्च ला एक दिवस बाई चे उदात्तीकरण करायचे तिचे गोडवे गायचे तिला देवी म्हणायचे आणि उरलेले ३६४ दिवस तिला उपभोग्य वस्तु समजून तिच्याशी वागायचे , बोलायचे, तिचे वरपासून खालपर्यंत स्कॅनिंग करायचे ,तिचे विभत्स चित्रीकरण करायचे ..

Similar News