काळ्या-गोऱ्या रंगात अडकून बसलेली समाजाची मानसिकता...

Update: 2020-06-29 19:00 GMT

एनडीटीव्हीवरील बातमीनुसार फेअर अँड लव्हली या क्रीमच्या नावातून फेअर हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे वर्णभेदाच्या विरुद्ध एक आश्वासक पाऊल आहे.

आजकाल आपल्या दुरचित्रवाणीवर गोरेपणाच्या जाहिरातीचा बाजार मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहोत. टीव्हीवरील जाहिराती काय सांगत आहे, असा विचार करताना खरतर हसू आणि कीव येते. त्याच सांगणं सतत शरीरच सौंदर्य आणि तथाकथित आरोग्य याभोवती फिरत राहत. यातून एक सतत जाणवत राहत हे हेच की, जागतिकीकरणाच्या या बाजारकेंद्री व्यवस्थेत नवनवीन प्रलोभन क्षणाक्षणाला सार्या च वयाच्या माणसांचं (गोरेपणाच्या क्रिमच्या जाहिराती, पुरुषासाठी डीओज, माचो, बिग बॉस पुरुष अंडरवेअर, चेहर्याmची बॅटरी चार्ज करणारे फेसवॉश इत्यादी ) लक्ष खेचून घेताहेत. एक विशिष्ट क्रीम लावून काही दिवसातच आपली त्वचा गोरी होण्याचे दावे विविध कंपन्या करताना दिसतात. काही जाहिरातीमध्ये तर मुलगी गोरी असेल तरच तिच्यातील आत्मविश्वास वाढतो अन ती आपल्या वडिलांना तिचे लग्न तीन वर्षानी करावे म्हणून बोलते. उन्हातान्हात क्रिकेट खेळणार्याढ खेळाडूने पार्टीत जाण्यासाठी विशिष्ट क्रीम लावली तर पार्टीतील सर्व मुली तो गोरा आहे म्हणून त्याच्या मागे पळताना दाखवतात. किंवा एक विशिष्ट डिओ लावला तरच त्या पुरुषभोवती मुली आकर्षित होतात, छोटे रडणारे बाळ क्षणात हसू लागते इत्यादी इत्यादी. अशा अनेक जाहिराती आपण दुरचित्रवाणीवर पाहत असतो. ह्या जाहिरातीतील मुलगी जशी सहा आठवड्यात गोरीपान होते असेच नितळ सौदर्य आपल्याला मिळावे ह्यासाठी सर्व स्तरातील मुलींची धडपड सुरू असल्याचे दिसते.

आम्ही किशोरवयीन मुलीं आणि युवतीसाठी विविध प्रशिक्षण राबवित असतो. या प्रशिक्षणामुळे अगदी १२ -१३ वर्षाच्या छोट्या मुलीलाही गोरेपणाची भुरळ पडताना दिसत आहे. गोरा रंग म्हणजे सुंदरतेची संकल्पनाच बनत आहे. ज्या मुली लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत अशा मुलीच्या बाबतीत ती मुलगी किती गोरी हे पाहून लग्न ठरवले जात आहे.

भारतीयांसाठी स्त्रीचे सौंदर्य म्हणजे गोरी त्वचा व गोरा चेहरा इतकीच मर्यादित होताना दिसून येते. गोरेपणाच्या हव्यासाने अनेक आशियाई व आफ्रिकन देशामध्ये काळ्या व सावळ्या स्त्रियांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण केली आहे. सर्व प्रकारच्या जाहिरातीमध्ये गोरी मुलगी किंवा स्त्री हींच खरी सुंदर आहे असे दाखवितात. तुम्ही सावळे, काळे असाल तर कुठल्याही प्रकारची संधी मिळविण्यासाठी, लोकांच्या नजरेत भरण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर गोर व्हायलाच हाव असा संदेश या जाहिरातीमधून दिला जातो.

खरतर लोकांच्या त्वचेचा रंग व पोत हा त्याच्या तेथील हवामानानुसार व भौगोलिकदृष्ट्या ठरतो. भारतीय वा आशियाई देशातील लोकांचा वर्ण हा सावळा वा गहूवर्णीय रंगाकडे झुकणारा असतो. परंतु आज सावळा किंवा काळा वर्ण म्हणजे काहीतरी वेगळं किंवा चांगलं नसलेल किंवा अवांछित असा समज पसरविण्याच काम गोरेपणाची क्रीम बनविण्यार्याक अनेक कंपन्या करत आहे. ह्या गोरेपणाची भुरळ सर्व वयोगटातील स्त्रियांना पडत आहे.

या पार्श्वभूमीवर वर्ष २००९ मध्ये आपल्या देशात अनोख अभियान सुरू झाले. एक बुद्धीमान व चाकोरीबाह्य व नवनवीन भूमिका करण्याच धाडस असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नंदिता दास. नंदिता दास या अभियानाची ओळख बनली आहे. ‘डार्क इज ब्यूटीफूल’ हे अभियान “रंगा पलीकडचे सौंदर्य” या संकल्पनेवर आधारित एका चळवळीतील स्त्रियांनी सुरू केले आहे. नुकतेच साई पल्लवी या अभिनेत्रीनेही गोरेपणाच्या क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला.

प्रमुख भूमिका असलेली अभिनेत्री ही गोरीच असली पाहिजे किंवा मुलगा कितीही काळा असला तरी त्याला आपली बायको गोरीच हवी असते. स्त्री अत्याचार या विषयावर काम करत असताना अनेक पुरूषांना लग्न झाल्यानंतर आपली बायको काळी आहे म्हणून लग्न मोडतानाच्या घटना आम्ही पाहतो. अशा विचारांच्या तथाकथित मुख्य प्रवाहातील, निर्माते व दिग्दर्शकांनी नंदिता दास यांना चित्रपटात भूमिका हवी असल्यास रंग गोरा करण्याचे उपचार घेण्याचा सल्ला दिला असता त्यांनी तो नाकारला. नंदिता म्हणते मासिके, दूरदर्शन, चित्रपट सगळीकडे गोरेपणा आणि सौंदर्य हे समानार्थी शब्द झाले आहेत. अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही इतक्या सावळ्या असूनही तुमच्यात इतका आत्मविश्वास कसा काय?

या अभियानामध्ये नंदिता सहभागी झाल्यापासून त्यांना तरुण मुलीकडून लाखो ईमेल्स यायला लागले. ज्यामध्ये मुलींनी आपलं मन मोकळं केल होत त्यांना सावळ्या किंवा काळ्या रंगामुळे किती भेदभाव सहन करावा लागतो आणि अनेक जणीच्या मनात तर आत्महत्येचे विचारही येऊन गेलेत.

या अभियानामुळे अनेक जणींना आत्मविश्वास मिळावा व गोर्याय रंगाचे वेडे खूळ लोकांच्या मनातून कायमचे नष्ट व्हावे अशी भूमिका आहे. या प्रकारच्या दृष्टीकोनाला वसाहतिक मानसिकताच कारणीभूत नाही तर त्या मानसिकतेला खतपाणी घालणारी आजची स्त्रीयांचे वस्तूकरण करणारी बाजार व्यवस्थाही कारणीभूत आहे. रंग म्हणजे काय याविषयावर २००५ मध्ये एका आफ्रिकन मुलाला त्याच्या कलर या कवितेसाठी उत्कृष्ठ कवितेचा अवॉर्ड मिळाला होता या निमित्ताने ती कविता –

Colour

When I born, I black;

When I group up I black;

When I go in sun I black;

When I scared I black;

when I sick, I black;

And when I die, I still black;

And U white fellow;

When U born, U pink;

When U grow up, U white;

When U go in Sun, U red;

When u cold, U blue;

When U scared, u yellow;

When U die, U grey;

And U call me coloured….

याच पार्श्व्भूमीवर डार्क इज ब्यूटीफूल या रंग संकल्पनेविषयी युवतीचा दृष्टीकोण जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा उद्देश पुढीलप्रमाणे होता: –

१. युवतीच्या मते रंग आणि सौंदर्य विषयीच्या संकल्पना जाणून घेणे.

२. युवतीच्या मते रंग आणि सौंदर्य समानच आहे ह्या विषयीचे मत जाणून घेणे.

३. युवतीच्या मते रंग गोरा असेल तरच आपण सुंदर आहोत ह्या विषयीचे मत जाणून घेणे.

४. युवतीच्या मते रंग गोरा असेल तरच आपण कोणतेही काम आत्मविश्वासणे करू शकतो ह्या विषयीचे मत जाणून घेणे.

या सर्वेक्षणातून आलेले शोध व निष्कर्ष हे पुढील प्रमाणे आहेत :

१. एकूण युवतीपैकी १५-२० वयोगटातील (४४%) उत्तरदाते होते (युवती). २१-२६ वयोगटातील (३९.५%) होते. २६-३२ वयोगटातील (१६.५%) युवती होत्या.

२. एकूण २०० युवतीपैकी ४९% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे गोरा रंग होय. ५१% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे आकर्षक शरीर यष्टी होय. ५३% युवतींच्या मते सुंदर असणे म्हणजे ब्युटी विथ ब्रेन होय. २२.५% युवतीच्या मते सुंदर असणे म्हणजे सुंदर डोळे होय. २६% उत्तरदात्याच्या मते सुंदर असणे म्हणजे सुंदर असणे म्हणजे सुंदर केस होय.

युवतीच्या ह्या मतावर लक्ष केंद्रीत केले तर असे लक्षात येते की, सुंदर दिसण्यामध्ये सुंदर मनाची संकल्पना कोठेच दिसत नाही. जे वरवर दिसत तेच सुंदर वाटते.

३. स्वत:च्या रंगाबद्दल युवतींना काय वाटते हे जाणून घेतले असता एकूण २०० युवतीपैकी २५% युवतींना त्याचा रंग गोरा वाटतो. ६३.५% युवतींना त्यांचा रंग सावळा वाटतो. तर ११.५% युवतींना त्यांचा रंग काळा वाटतो.

४. एकूण २०० युवतींना त्यांच्या रंगाबद्दल काय वाटते हे जाणून घेतले असता २५% युवतींना छान वाटते. ३७.५% युवतींना वाईट वाटते. तर ३७.५% युवतींना अजून गोरे असायला पाहिजे होते असं वाटते.

५. एकूण २०० युवती स्वत:चा रंग बदलावा म्हणून कोणती क्रीम वापरतात हे जाणून घेतले असता २५% युवती फेयर अँड लव्हली क्रीम वापरतात. १०% युवती पॉंन्डस व्हाइट ब्यूटी क्रीम वापरतात. १२.५% युवती अॅमवे व्हाइट इसेन्स वापरतात. ११% युवती नेविया क्रीम क्रीम वापरतात. १७.५% युवती ओरिफ्लेयम व्हाइट क्रीम वापरतात. तर २४% युवती ऑले टोटल इफेक्ट क्रीम वापरतात.

६. एकूण २०० युवतीना एका महिन्यात गोरेपणाच्या क्रीमसाठी किती खर्च करतात हे जाणून घेतले असता १५.५% युवतीना रु. १००-२००/- इतका खर्च येतो. १९.५% युवतीना रु २०१-३००/- खर्च येतो. २१.५% युवतीना रु. ३०१-४००/- इतका खर्च येतो. २५.५% युवतीना रु. ४०१- ते ५००/- इतका खर्च येतो. तर १८% युवतीना रु. ५०१ ते त्यापेक्षा अधिक खर्च येतो.

७. एकूण २०० युवतीना त्यांच्या असलेल्या रंगामुळे कधी काही त्रास झाला का हे जाणून घेतले असता ६३.५% युवतीनी त्रास झाला असे मत व्यक्त केले तर ३६.५% युवतीनी त्यांना कोणताही त्रास झाला नाही असे मत व्यक्त केले.

८. एकूण १२७ युवतीपैकी एकूण ९.४४% युवतीना ते शाळेत असताना त्याच्यासोबत भेदभाव झाला असे सांगितले. २८.३४% युवतीना ते कॉलेजमध्ये मूल-मुली चिडवतात असे सांगितले. २६.७७% युवतीना त्यांच्या रंगामुळे मित्र –मैत्रिणी नाहीत. २०.४७% युवतीना त्यांचे शिक्षक भेदभाव करते असे वाटते. तर १४.९६% युवतीना त्यांना कोणत्याही सामाजिक उपक्रमात भाग घेता येत नाही. असे मत व्यक्त केले.

९. एकूण २०० युवतीनी रंगामुळे होणार्याा भेदभावामुळे २८.५% युवतीना नाही म्हणून त्रास होत असे. ३२% युवतींना जीव नकोसा वाटला तर ११.५% उत्तरदाते दुखी झाले अशा भावना व्यक्त केल्या.

१०. एकूण २०० युवतीच्या मते सुंदर म्हणजे गोरे आणि गोरे म्हणजे सुंदर असणे याविषयीचे मत जाणून घेतले असता ६२% युवतीनी होय असे मत व्यक्त केले तर ३८% युवतीनी नाही असे मत व्यक्त केले.

रेणुका कड

(लेखिका महाराष्ट्र राज्याच्या एकल महिला धोरणाच्या समितीची समन्वयक आहे. तसेच स्त्रियांचे संवैधानिक हक्क बाल हक्क इ. विषयावर त्यांचे लिखाण आहे.)

Similar News