सत्यवानाची सावित्री व्हायचंय की महात्मा फुलेंची ?

Update: 2020-06-05 08:49 GMT

वटपौर्णिमा हा सण महिलांसाठीच आहे, असा कोणताही सण पुरुषांसाठी नाही.

महिला नटून-थटून आवडीने वटपौर्णिमा साजरी करतात, सध्या लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, घरी राहणे गरजेचे आहे. काही ठिकाणी 144 कलम असल्यामुळे महिलांनी गर्दी करता कामा नये.

एखाद्या महिलेचे पुरुषाशी लग्न झाल्यानंतर त्या महिलेला मंगळसूत्र, बांगड्या आणि जोडवी घातली जातात परंतु अशी कुठलीही बंधने पुरुषांना नसतात.

एखाद्या महिलेच्या पतीचे निधन होते तेव्हा संबंधित महिलेला विधवा/ परितक्त्या संबोधले जाते परंतु एखाद्या पुरुषाच्या पत्नीचं निधन झाले तर त्याला मात्र विधवा किंवा इतर शब्द वापरला जात नाही.

पतीच्या निधनानंतर महिलेला पांढरी साडी घालनणे,बांगड्यां न घालणे, टिकली न लावणे असे नियम घातले जातात सध्या परिस्थिती थोडीफार बदलली ही आहे परंतु 90% परिस्थिती ग्रामीण भागात तशीच आहे.

महिलांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा... वटपौर्णिमा सण साजरा करा ,पूजा करा परंतु एकविसाव्या शतकात समानता आहे त्यामुळे थोडा बदल करणे गरजेचे आहे. सत्यवानाची सावित्री व्हायचं की महात्मा ज्योतिबा फुले यांची सावित्री व्हायचं हे आता स्वतः महिलांनी ठरवण्याची वेळ आली आहे.

-तृप्ती देसाई

(संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड)

Similar News