कलीयुगातील राम सीता

Update: 2020-06-10 01:15 GMT

आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवनाच विचारलं तर ते नको म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की, तुम्ही असे का हिंडताय? मग सुरू झाला त्यांचा जीवनपट...

ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकाला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की, माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले ऑपरेशन करून उपयोग नाही. म्हणून माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्णा मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.

मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली. मग मी ते 25% हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्दी ऐकून सुन्न झाली त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय. तर, त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय (एवढं शिकून सुद्दा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व सुद्धा नाही. नाहीतर आपल्याकडे 10 नापास वालासुद्धा छाती ताणून हिंडतो ) एवढच नाहीतर व सी रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रीचे सबंध होते. तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्टला ते देऊन टाकतात. सद्या ते सोशल मीडियापासून लांब राहतात.

रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतचं असं नाही. एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतं आणि आपल्या पतीसोबत कोणी सीता सुद्धा होतं. म्हणूनच आज भेटलेली माणसे मी तर कली युगातील राम सीताच समजतो. आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच. इतके प्रगल्भ विचार एकूण मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहचायला एक महिना लागेल. त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय व डॉ. सरोज उपाध्याय.

लेख-प्रमोद आसने

Similar News