ती आणि तिची मासिक पाळी

Update: 2020-05-28 13:05 GMT

UNISEF (United Nations International Children's Emergency Funds) ने आज २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणुन जाहीर केला.

परंतु मासिक पाळी कडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र अजून अजून फारसा बदलला नाही. अजूनही कित्येक घरात मासिक पाळी आलेली मुलगी घरातल्या कुठल्या तरी अस्वच्छ खोली मधे ते चार दिवस राहते. जिथे ना स्वच्छता असते ना सोयी सुविधा असतात.

खरे पहायला बघता पूर्वी जेव्हा मासिक पाळी आलेल्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून तीले वेगळे बसवले जात असे. कारण त्यावेळी आत्ता अस्तित्वात आलेल्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे धुणी भांडी, घर सारवणे ,घरातील इतर कामे हे स्त्री स्वतः एकटी घरात करत असे. अशा वेळेला मासिक पाळी चा काळात आरामाची गरज म्हणून ती वेगळी एका खोलीत वावरत असे. मात्र ह्या गोष्टीला वेगळे वळण मिळत आज मासिक पाळी म्हणजे अशुद्ध ह्या काळात त्या स्त्री ने देवाची पूजा करणे किंवा घरात धार्मिक कार्यक्रम करणे इतकेच नव्हे तर त्या स्त्री ला स्पर्श करणे म्हणजे पाप असे विचार समाजात रुजू लागले.

अशा विचारांमुळे मासिक पाळी बद्दल खुल्याने बोलणे अशक्य होवू लागले आणि ह्या विषया कडे दुर्लक्ष होऊ लागले. ग्रामीण भागातील स्थिती तर ह्याहूनही भयानक आणि अंगावर शहारे येण्यासारखीच आहे. ना मासिक पाळी बद्दल योग्य माहिती किशोवयीन मुलींना मिळते न मुभा मेडिकल मधे जाण्याची. ह्या गोष्टीची दुसरी बाजू पाहिल्यास आढळून येते की मासिक पाळी क्या काळात स्वच्छता किती महत्त्वाची ह्या कडे ही दुर्लक्ष झाले. किंवा ह्या चार दिवसांत स्वच्छता कशी राखावी हे माहीत नसल्यामुळे गर्भाशयाचे कॅन्सर अशा रोगांना तोंड द्यावे लागत आहे.

वास्तविकता ज्या गोष्टीमुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव मिळतो त्या गोष्टी कडे अशा दृष्टिकोनामुळे स्त्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि कदाचित भविष्यात सुद्धा. असे म्हणतात कोणत्याही गोष्टीत सुधारणा करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागते तर मग ह्या गोष्टीत का नाही ? चला तर मग करूयात स्वतःपासून सुरुवात!! स्त्री चे ते चार दिवस सुंदर बनवण्याची जबाबदरी घेऊया.

- रिद्धी नितीन बुटाला

Similar News