एका एनकाऊंटरने नाही सुटणार, प्रश्न बलात्कार पिडितांचे...

Update: 2019-12-07 08:26 GMT

रेप survivors साठीचा मनोधैर्य-निर्भया फंड महाराष्ट्रात वापरलाच गेला नाहीये...

तेव्हा नाही कोणी पोस्ट लिहिल्या सरकारच्या निषेधाच्या....जशा लिहिल्या आज कौतुकाच्या...

या एनकाऊंटरने नाही होणार नव्या पिढीचं सेक्स एज्युकेशन,

बेकायदेशीर एक्स्ट्रा ज्युडिशिअल हत्यांएेवजी त्या उमलत्या मुलांना द्यावे लागतील लैंगिक शिक्षणाचे धडे...

हैद्राबाद आणि वारंगलच्या एनकाऊंटरनंतर नाही होणार मुली निर्भिड...

तुम्हीच सांगत राहाल तिला बाईच्या जातीने हे करू नये आणि मुलीने काय करावं...

एनकाऊंटर नाही शिकवणार तुमच्या मुलाला, एखाद्या मुलीशी सभ्यपणे आदराने प्रेमाने कसं वागता येतं...

एनकाऊंटर नाही थांबवणार बलात्कारी मनांमधले पाशवी विचार...

या उन्मादात मी सहभागी होणार नाही म्हटलं, तर कितीतरी जणांनी मलाच विचारलं तुझ्यावर बलात्कार झाला तर काय?

पुरूषी दहशत वेगळी नसते...एनकाऊंटरपेक्षाही ती खतरनाक विकृत असते...

बाईवरच्या बलात्काराचे व्हिडिओ शोधणारा, बाईला सभ्य शब्दात तुझ्यावरही बलात्कार होऊ शकतो, ही आठवण करून देणाराही असतो या विकृतीचा एक भाग...

तुमच्या माझ्या बाजूला वळवळतेय ती विकृती दूर करायला समाजाला सतत दूरगामी काम करावं लागेल...

एका दिवसात चार जणांना न्याय प्रक्रियेसमोर न आणता मारून, सोशल मिडियावर उन्मादी वागून नाही सुटणार हे गुंतागुंतीचे प्रश्न

- अल्का धुपकर (पत्रकार)

Similar News