कोरोना शी लढत असा घ्या जीवनाचा आनंद

Update: 2020-03-21 14:36 GMT

आहे तो सूक्ष्म विषाणू. त्याच्या संपर्कातून होणारा संसर्ग फार हानीकारक आहे. पत्त्यांचा पाच मजली इमाला बांधून झाल्याचा आनंद कुठे नीट घेतो न घेतो. तोच हवेची हलकीशी झुळूक यावी आणि पत्यां ची पाच मजली इमारत पूर्ण पणे कोसळून जावी. अगदी अशीच यापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचे नेमके गांभीर्य समजून घेऊन स्वतः हून आपण आपला उद्योग व्यवसाय काही काळ बंद करून घरात थांबावे. यातून काही काळाचे चलन बंद होईल. ते परत कमवता येईल पण घरातील कमवती तसेच कर्ती व्यक्ती यासह संपूर्ण हसते खेळते कुटुंब जपणं हे प्रमुख कार्य आपलेच आहे.

बाकी साबण, सॅनिटायझर, मास्क, यासम सगळे जेजे प्राथमिक उपाय योजना आहेत ते ते आपण करतो वा करायला मागतो. चढ्या किंमतीत हे बाजारात विकत असतील तरी विकत घेतो. कारण आपल्यातील भीती, काळजी असं बरचं काही एकत्रित दाटल्याने नेमके काय करावे हेही यावेळी समजत नसल्याने. साहजिक आहे.

आपणच आपली काळजी घेऊ शकतो. तेही न घाबरता. अगदी सोपा उपाय. सर्व प्रथम आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घरात बंदिस्थ करून घ्यायचे. आजकाल घरातच सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे बाहेर पडण्याची गरज नाही. नियमित काम करण्याची सवय असताना एकदम रिकाम बसवत नाही. मग काय?

मोठा प्रश्न. तुम्ही घरातच असल्याने तसेच नियमित हात धुण्याची पद्धत छान वापरत आहात किंवा वापरायला शिकला असाल. फार काळजी नसावी. घरातल्या घरात काय करायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो.

ज्या स्त्रिया घरात आहेत त्यांना घरातील काम संपवता ना दिवस कसा संपतो हेही लक्षात येत नाही. पण पुरुषांचे काय? फार जास्त विचार करू नका. घरात बसून सोपे काय काय करता येईल ते जरा समजून घेऊ. त्याची लिस्ट करू. घरात किचन मध्ये काही करता येऊ शकतं का,? जसं की कांदा, कोथिंबीर कापून देणं, भाजी साफ करणे, किंवा एखादी नवीन भाजी बनवणे आणि सर्वांना खीलवणे यात वेगळा आनंद असतो.

विशेष हे सगळं करताना मन आणि हात काही कामात गुंतलेले असल्याने वेगळे कोणतेही विचार मनात येत नाही. कसं आहे ना प्रत्येक घरातील किचन म्हणजे प्रयोगशाळा आहे. तिथे आपण अनेक प्रयोग करू शकतो तेही यशस्वी आणि अयशस्वी ही. अनेकांना कौतुक करून घेण्याची उत्तम जागा

बरं किचन पलीकडे काय काय करू शकतो? तर आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. सर्वांना लिहिता वाचता येतं तर जेजे मनात येईल ते लिहून काढा, किंवा मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा म्हणजे आपल्याला जेजे सूचत ते बोलायचं आणि रेकॉर्ड करायचं. यामध्ये बालपणीच्या अनेक गोड, आंबट, तिखट आणि कडू आठवणी असतील. बोलुन टाकायच्या किंवा लिहून काढायच्या. आईचा पहिला धपाटा, तिने केलेला लाड, सायकल शिकतांना झालेली फजिती. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी. पण यांना उजाळा दिला तर नक्कीच नवचैतन्य निर्माण होईल. करून तर पहा.

घरातील सर्वांनी जमून पत्ते, कॅरम, गाण्याच्या भेंड्या खेळा, अनेक आवडीचे चित्रपट पाहायचे राहिले त्याची लिस्ट करून ते पहा , आवडीचे गाणे ऐका. एकत्र बसून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा, विणकाम, पेंटिग, यासारखे हस्तकला घरातील घरात करत बसा.

आजकाल ऑनलाईन वर बरचं काही आणि सहज उपलब्ध होते त्यातूनही पेपर, मासिक, कथा कादंबऱ्या वाचता येतील. कोरोनाबद्दल माहिती घ्यावी पण त्यासाठी शासन मान्य चित्रवाहिनी, न्युज चॅनलवर फार फार अर्धा ते एक तास भरपूर झाला यापेक्षा जास्त वेळ देऊ नये. इकडचे तिकडचे मेसेज वाचून आपली काळजी वाढवू नये.

रोज सायंकाळी सर्व जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांना कॉन्फरन्स कॉल करून ख्याली खुशाली विचारून घेतली जाऊ शकते. असं बरंच काय काय आहे ते करता येईल. मुख्य म्हणजे आपल मन गुंतेल. आपण सर्व सुरक्षित घरातच राहिलो तर शासन, प्रशासन, कायदा सुव्यवस्था, आरोग्य विभाग यावर अतिरिक्त ताण येणार नाही. आणि कमी दिवसात आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. हेच आपल्या हातात आहे. आपली काळजी घ्या.यातूनच नकळतपणे इतरांनीही काळजी घेतली जाईल.

-त्रिवेणी भोंडे

Similar News