मंगळसूत्र फक्त बाईनेच घालायच?

Update: 2020-07-06 03:09 GMT

मंगळसूत्र फक्त बाईनेच घालायच.. ते ही तिची चॉईस म्हणून नाही, तर तिच्या नवऱ्याचं प्रतिक म्हणून... थोडक्यात माझ्या आयुष्यात एक पुरूष ऑलरेडी आहे. आय ॲम बुक्ड वगैरे टाईप वाटत ना काहीस..!!

गोंडस भाषेत मंगळसूत्राला ‘सौभाग्यलक्षण’ म्हटलं जात. म्हणजे बाईच लग्न झाल तरच तिचं भाग्य हे सुभाग्य, नवरा असलेलीच बाई चांगल नशिब असलेली वगैरे...

फक्त मंगळसूत्रच नाही, तर बांगड्या जोडवी आणि काय काय.. शरीराचा बराचसा भाग तिने सौभाग्याच्या प्रतिकांनी मढवायचा.

नवरा आहे म्हणून तिने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा, आपलं सौभाग्यपण मिरवायचं. प्रत्येकवेळी “अखंड सौभाग्यवती भव” हा आशिर्वाद घ्यायचा... का? बाईचं स्वत:च अस्तित्व काहीच नाही का? हळदी कुंकवावेळी नवरा गेलेल्या स्त्रीयांना का वगळल जात? तू सुखात समाधानात रहा, चिरायुषी हो असा आशिर्वाद का नाही दिला जात बाईला?

वटपौर्णिमा पण म्हणे बाईने मुबलक आॅक्सिजन मिळवायला करावी? आधीच्या काळात स्त्रीयांना बाहेर पडता येत नव्हत म्हणून म्हणे हे हळदी कुंकू, वटपौर्णिमा पूजेचे प्रपंच!! रिअली.. मग जिथे तिथे तिच्या आयुष्यात नवरा आहे का नाही हाच क्रायटेरिया का? आणि बायकाच फक्त जगतात का ऑक्सिजनवर? पुरूष काय बाबाचं प्राणायम करून ऑक्सिजन विरहित जगायला शिकलेत का?

आधीच्या काळात नवरा गेला की बाईला जीवंत जाळायचे. मग थोडी बाईवर दया म्हणून तिला जीवंत तर ठेवलं बापड्यांनी, पण तिचे केस कापून, पांढरी साडी नेसायला लावून, तिला कुरूप करून... का तर तिच्यावर वाईट नजर पडू नये. नवरा नाहीतर बाईचं चित्त इकडे तिकडे भटकू नये. अरे मग तुमच्या वाईट नजरा सांभाळा की.. तुमच्या वाईट नजरा टाळायला तिने विद्रूप व्हायचं? आणि पुरूषाने बायको मेल्यानंतर मारे कितीही लग्न केली तरी चालायच. बाईने दुसरं लग्न केलं तर मग काय खटकायच एवढं त्यात?

मूल होत नसेल तरी बाईलाच दोषी ठरवल जायच. मग मूलासाठी नवऱ्याची किती ती लग्न.. त्या बाकीच्या बायकांनाही मूल नाही झालं तरीही पुरूष हा नेहमीच दोषविरहित.. दोष तर नेहमी बाईतच असतो नाही का..

पुरूषाच्या आयुष्यात बायको आहे, हे पुरूषाचं भाग्य नसत का? सकाळ पासून रात्रीपर्यंत बायको दिमतीला लागते ना, तर मग नक्कीच बायकोच आयुष्यात असणं भाग्य असावं नाही पुरूषांच.. तर मग पुरूषांचे सौभाग्यलंकार कुठेत? त्यांनी का बायकोची प्रतिक मिरवायची नाहीत अंगावर? आणि ते चक्र वगैरे जशी स्त्रीयांना असतात तशी पुरूषांना नसतात वाटत?

बाईला वाटेल तेव्हा, वाटलं तर मंगळसूत्र घालेल ती.. फक्त एक दागिना म्हणून. वाटेल तेव्हा काढून फेकेल दागिन्यांच्या कप्प्यात.. तिने काय घालावं, काय घालू नये ठरवारे तुम्ही कोण?? तुम्ही तुमच्या नजरांवर वर्क करा, तुमच्या मेंदूला हलवा, जो समजतो मंगळसूत्र न घातलेली बाई एक संधी असते..

 

  • सई मनोज देशमाने

सई मनोज देशमाने यांच्या फेसबुकवरुन साभार

Similar News