केरळच्या आरोग्यमंत्र्यांचा यूएनच्या कार्यक्रमात सत्कार

Update: 2020-06-27 06:59 GMT

कोविड -१९ विरूद्ध प्रभावीपणे काम केल्याबद्दल केरळच्या महीला आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना यूएनने पब्लिक सर्व्हिस डे निमीत्त स्पीकर म्हणून आमंत्रित केलं आहे. शैलजा यांनी प्रतिकूल परिस्थीतीत देखील राज्याच्या हितासाठी भरिव योगदान दिलं या बद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यामुळे केरळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रेवला गेला, केरळच नाही तर संपूर्ण देशभरासाठी ही गौरवाची गोष्ट आहे. कोविड काळात आपले भरिव योगदान देणाऱ्या विवीध देशांतील सार्वजनिक सेवकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

आरोग्य सेवा, स्वच्छता, समाज कल्याण, शिक्षण, टपाल वितरण, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था किंवा अत्यावश्यक सेवा पुरविणे असो सार्वजनिक सेवकांनी समाजात काम करणे सुरूच ठेवले पाहिजे असं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने एका निवेदनात म्हटलं. निवेदनानुसार, थेट लाईव्ह कार्यक्रमात मुख्य वक्त्यांमध्ये अँटनिओ गुटेरेस, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस, तिजनी मुहम्मद-बांदे, महासभेचे अध्यक्ष एच. ई. कु. साहले-वर्क झेवडे, इथिओपियाचे अध्यक्ष, डॉ टेड्रॉस अॅडनॉम घब्रीयसस, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना लियू झेनमीन, संयुक्त राष्ट्र संघाचे आर्थिक व सामाजिक कामकाजाचे सरचिटणीस, कोरिया प्रजासत्ताक, गृह व सुरक्षा मंत्री चिन यंग, कोरिया प्रजासत्ताक, अंतर्गत व सुरक्षा उपमंत्री डॉ. इन-जे ली, जिम कॅम्पबेल, संचालक, आरोग्य कर्मचारी दल विभाग जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय परिचारिक परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅनेट कॅनेडी आणि पब्लिक सर्व्हिसेस इंटरनेशनलचे सरचिटणीस रोजा पावनेल्ली. यांचा समावेश आहे.

Similar News