कोरोना रुग्ण संखेत रशिया आणि भारतात फक्त आठ हजार रुग्णांचा फरक

Update: 2020-07-06 02:06 GMT

जगभरात आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 72 हजार 340 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत तब्बल 60 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 30 हजार 898 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशिया आणि भारत यांच्यामध्ये जवळपास आठ हजार रुग्णांचा अजून फरक आहे. पण भारतात सध्या वीस हजारांच्यावर रुग्ण दररोज सापडत आहेत. त्यामुळे लवकरच कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 28 76 हजार 142 एवढी झालेली आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सोळा लाखांच्या वर गेली आहे.

Similar News