पोरांनो अभ्यासाला लागा.. 10 वी आणि 12 वी च्या परिक्षांच्या तारखा जाहिर

शैक्षणीक वर्षाच्या कालावधीत बदल..

Update: 2021-01-21 10:30 GMT

या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारखा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केल्या आहेत. दहावीची परीक्षा 29 एप्रिल 2121 ते 31 मे 2021 दरम्यान तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे. दहावीच्या परिक्षांचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीच्या परिक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार असल्याचं देखील मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतलं आहे.

शैक्षणीक वर्षाच्या कालावधीत बदल..

दरवर्षी 10 वीच्या परिक्षा मार्च महिन्यात तर बारावीच्या परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होतात. त्यामुळे शैक्षणीक वर्ष हे साधारण जून ते एप्रिल असं मानलं जायचं मात्र आता परिक्षाच लांबल्याने शैक्षणीक वर्षाचा कालावधी बदलला आहे.

Tags:    

Similar News