शनी व गुरुची अद्भुत युती, 400 वर्षांनंतर प्रथमच; नक्की पहा

आज पर्यंत तुम्ही अनेक युती आघाड्या बघितल्या असतील ही युती जरा अद्भुत आहे..

Update: 2020-12-19 05:30 GMT

सरत्या वर्षात २१ डिसेंबरची रात्र आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात गुरु आणि शनी हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते. या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते.

आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.

जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, "गुरू" हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो. तर "शनिला" २९.५० वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे १९ वर्षे आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.२१ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील.

ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना २१ डिसेंबर रोजी शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही.

Tags:    

Similar News