Business Idea: सरकारच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केलात तर कमवाल वर्षाला ६ लाखांचा नफा!

Update: 2021-12-19 08:33 GMT

Business Idea: आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही आपल्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. प्रत्येक वर्गात या व्यवसायाची मागणी असते. हा व्यवसाय आहे साबण निर्मितीचा! खरं तर आपल्याला या व्यवसायात जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. यासोबतच सरकारही आपल्याला यामध्ये मदत करेल. चला तर मग या व्यवसायाबद्दल सखोल माहिती जाणून घेऊयात.


या व्यवसायात मशिनच्या साहाय्याने साबण बनवला जातो. साबण बनवल्यानंतर त्याची बाजारात विक्री केली जाते. बरेच लोक हाताने साबण बनवतात आणि बाजारात विकतात. महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणातही सुरू करता येतो. बाजारातील साबणेच्या मागणीमुळे हा व्यवसाय प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होतो.


भारतात साबण मार्केटचे अनेक प्रकार आहेत. साबण मार्केट त्याच्या वापराच्या आधारावर विविध प्रकारांमध्ये विभागला जातो. उदा., कपडे धुण्याचा साबण, ब्युटी सोप, मेडिकेटेड साबण, किचन सोप, सुगंधी साबण इत्यादी प्रकार आहेत. मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन आपण यापैकी कोणताही प्रकार निवडू शकता.

केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोफाइलनुसार, आपण एका वर्षात एकूण सुमारे 4 लाख किलो साबणेचं उत्पादन करू शकाल. ज्याची एकूण किंमत 47 लाख रुपये असेल. या योजनेंतर्गत, आपल्याला सर्व खर्च आणि इतर बिलं वगैरे वजा केल्यानंतर 6 लाख रुपये म्हणजेच दरमहा 50,000 रुपये निव्वळ नफा मिळेल.


 साबण बनवण्याचं युनिट सेट करण्यासाठी, आपल्याला एकूण 750 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. त्यासाठी 500 चौरस फूट बंद आणि उर्वरित खुली जागा आवश्यक आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या मशिनरीजसह 8 प्रकारची उपकरणं लागतील. प्रकल्प अहवालानुसार ही यंत्रे बसवण्यासाठी एकूण खर्च फक्त एक लाख रुपये येणार आहे.


साबण व्यवसायाच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची मागणी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत, गावां-गावांमध्ये आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण अगदी कमी पैशात साबण कारखाना उघडू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकता.


साबण बनवण्याचे एक उत्पादन युनिट उभारण्यासाठी आपल्याला एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. पण हा व्यवसाय सोपा आहे कारण त्यात युनिटची जागा, यंत्रसामग्री, तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाच्या सहाय्याने उभी करू शकता.



Tags:    

Similar News