महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प

Update: 2019-06-19 06:17 GMT

राज्यातील ४ कोटी १६ लाख महिला मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्याचं स्पष्ट होतंय. विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी २०० कोटी, अल्पसंख्याक तरुण महिलांना रोजगार देण्यासाठी १०० कोटी, महिला बचत गटांसाठी नवी प्रज्वल योजना, महिला सुरक्षितता पुढाकारासाठी २२५ कोटी आदी योजना आणि तरतुदींचा पाऊस मंगळवारी फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाडला आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या शहरी प्रकल्पातील भूखंडामध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण देण्यात आलंय. सर्व काही निवडणुकीसाठी हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या महिला मतदारांसाठी निवडणूक संकल्प शिवसेना-भाजपा युती सरकारने जाहीर केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महिला मतदारांची संख्या १३ लाखांनी वाढल्याचे समोर आले होते.

४ कोटी १६ लाख महिला ५२५ कोटी रूपये या अर्थसंकल्पातून महिलांसाठी दिले आहेत.

Similar News