गुलाबो साठी "गुलाब" घेताना पाकीट आता जड ठेवा ...

Update: 2023-02-10 11:47 GMT

"व्हॅलेंटाईन वीक" म्हटलं की एक आठवडा प्रेमात जातो. पण हे प्रेम करत असताना आपल्या प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी गुलाब विशेषता वापरला जातो. मुळात गुलाब हे फुलच प्रेम दर्शवते आणि त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फूल अनेक जण खरेदी करतात. आपल्या मनातील गुलाबाला म्हणजेच आपल्या प्रियकराला किंवा प्रियसीला देतात. पण आता व्हॅलेंटाईन वीक (valentine week )मुळे गुलाबाच्या फुलाचा दर वाढला आहे. इतर वेळी ८ ते १० रुपयांना मिळणारे गुलाबाचे फुल आता 40 ते 50 रुपयांपर्यंत महाग झाले आहे .


 या सगळ्यांमध्ये गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होत आहे .तरुण-तरुणींमध्ये व्हॅलेंटाईन वीक जोरदार सुरू असला, तरी याचा फायदा मात्र मार्केटमधील अनेक लोक घेताना दिसत आहेत. कारण या प्रेमाच्या आठवड्यात वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन समोरच्या व्यक्तीला म्हणजेच व्हॅलेंटाईन ला खुश करण्याचे प्रयत्न अनेक जण करतात . त्यामुळेच गुलाब सुद्धा आता महाग झाला आहे .


गुलाबाचं फुल असणारे बुके म्हणजेच पुष्पगुच्छ ची किंमत सुद्धा हजारो रुपयांपर्यंत गेली आहे . त्यामुळे जर तुम्हाला या आठवड्यात गुलाब घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या पाकिटात थोडे पैसे जास्त ठेवावे लागणार आहेत.

Tags:    

Similar News