#Mandeshi mahotsav या आजीचे माणदेशी बोल एकदा ऐकाच

Update: 2023-01-07 10:45 GMT


  माणदेशी सारख्या दुष्काळी भागातील या भगिनी व्यवसाय करतात आणि त्याचं मुंबई मध्ये प्रदर्शन भरवतात ही फार प्रेरणादायी गोष्ट आहे. माणदेशी महोत्सव ग्रामीण महिलांच्या कष्टांची ओळख बनलेला आहे. संकटावर मात करून महिला शक्ती काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणदेशी महोत्सव आहे. या सगळ्या जणींचा संघर्ष शब्दांपलिकडचा आहे. या संघर्षाला सलाम करण्यासाठी प्रत्येकाने महोत्सवाला भेट दिली पाहिजे.असा हा महोत्सव आहे . 


Full View

    माणदेशी महोत्सव म्हणजे निव्वळ माणदेशी भगिनींचा महोत्सव राहिलेला नसून तो महाराष्ट्रातील संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलांचा आहे. हा महोत्सव देशांतील प्रत्येक शहरांमध्ये भरवला जावा जेणेकरुन आपल्या महाराष्ट्राची अस्सल ग्रामीण संस्कृती देशभर पोहोचेल. माणदेशी महोत्सवास मुंबईकरांनी भेट देऊन या माणदेशी भगिनींना प्रोत्साहित करावे, यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत.या महोत्सवाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने भेट दिली आहे . 

     माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले 'गझी नृत्य' पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.


Tags:    

Similar News