Home > निर्मला सीतारमण देश वाचवू शकतील का?

निर्मला सीतारमण देश वाचवू शकतील का?

निर्मला सीतारमण देश वाचवू शकतील का?
X

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजचा पहिला टप्पा आज घोषित केला. खरंतर यातील अनेक तरतूदी या आधीच रिजर्व बँक आणि अर्थखात्याने केलेल्या आहेत. आज सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजवर एकूणच संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. अनेकांना निर्मला सीतारमण देशाची अर्थव्यवस्था वाचवू शकतील याबाबत शंका आहे.

हे ही वाचा..

भाजपच्याच सुब्रमण्यम स्वामी यांनी निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद सुरू झाल्या झाल्या ट्वीट करून या पॅकेजचं हेतू, प्राधान्यक्रम, रणनीती आणि स्त्रोत पाहायला लागतील असं म्हटलं होतं. काही वेळाने आणखी एक ट्वीट करून असं आपलं नाही तर कुठल्या तरी ट्वीटकऱ्याचं म्हणणं असल्याचा खुलासा त्यांनी केला.

सामान्य जनतेच्या हातात थेट पैसा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी काम केलं पाहिजे होतं, मात्र त्या सप्लाय साइड चा विचार करतायत, डिमांड साइड चा नाही अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Updated : 13 May 2020 5:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top